राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची स्तुती की आदित्य – उद्धव ठाकरेंच्या यात्रांची जाहिरातबाजी ?

विनायक ढेरे

सामनाने अग्रलेखातून गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये काँग्रेसची भलामण करणे यात फारसे काही वेगळे राहिलेले नाही. अशीच भलामण आजही सामनाच्या अग्रलेखातून आली आहे. पण काँग्रेसच्या या भलामणी बरोबरच उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या यात्रांची जाहिरातबाजी देखील या अग्रलेखात केली आहे. Saamna editorial parise rahul Gandhi’s bharat Jodo yatra, but moreover advertise aditya and Uddhav Thackeray’s yatras

काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा तब्बल 1700 किलोमीटरचा असणार आहे आणि विविध राज्यांमधून ही यात्रा जाणार आहे. अर्थातच गलितगात्र काल झालेल्या काँग्रेस संघटनेला संजीवनी देण्याची ही उपाययोजना आहे. यातून काँग्रेसला किती संजीवनी मिळेल?, हे येणारा काळ ठरवणार आहे. पण या भारत जोडो यात्रेवर भाजपचे नेते जी टीका करत आहेत, त्या टीकेला काँग्रेसच्या नेत्यांऐवजी पुढे येऊन शिवसेनेच्या ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर दिले आहे.

अन्य यात्रांचे दाखले

काँग्रेसकडे स्वातंत्र्यलढ्याचा प्रचंड मोठा वारसा आहे. सध्या तो पक्ष गलितगात्र असला तरी एकेकाळी तो देशातला सगळ्यात मोठा पक्ष होता. भाजपकडे स्वातंत्र्यलढ्याचा काय वारसा आहे?? अडवाणींनी काढलेल्या रथयात्रेची फळे भाजप आज चाखतो आहे, वगैरे युक्तिवाद या अग्रलेखात केला आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण त्यापुढे जाऊन या अग्रलेखातून यात्रांचा इतिहास लिहिताना राजीव गांधींनी यात्रा काढली. चंद्रशेखर यांनी यात्रा काढली. आंध्र प्रदेशात वाय. एस. आर. राजशेखर रेड्डी, त्यांचे पुत्र जगन मोहन रेड्डी, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी यात्रा काढल्याचे दाखले दिले आहेत आणि त्याच वेळी आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या निष्ठा यात्रेला महाराष्ट्रातून “प्रचंड” प्रतिसाद मिळाल्याचीही जाहिरात अग्रलेखात केली आहे आणि नेमका प्रश्न इथेच आहे!!



आदित्यचे मुंबई पुरते शक्तिप्रदर्शन

मूळात आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढली ती साधारणतः मुंबई आणि परिसरातच. मुंबईतल्या विविध प्रभागांमध्ये जाऊन त्यांनी आपले शक्तिप्रदर्शन केले. ते क्वचितच महाराष्ट्रात इतरत्र गेले आणि त्यांना जो काही प्रतिसाद मिळाला तो प्रचंड होता, अशी मखलाशी सामनाने केली आहे… आणि त्यापलिकडे जाऊन उद्धव ठाकरे हे आता महाप्रबोधन यात्रेला निघणार असल्याचे सामनाने अग्रलेखात म्हटले आहेत.

महाप्रबोधन यात्रा कुठे – कशी – केव्हा?

मूळात उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, हीच तर मुख्य तक्रार करून शिवसैनिक आणि शिवसेनेचे 40 आमदार ठाकरे गटाबाहेर पडले. ठाकरे – पवार सरकार गेले. ते जाऊन दोन महिने झाले तरी उद्धव ठाकरे अजून महाप्रबोधन यात्रेला निघणारच आहेत!! त्यांची महाप्रबोधने मातोश्री आणि परिसरातच घडताना दिसत आहेत. जो कोणी निष्ठावंत शिवसैनिक, लेखक, साहित्यिक असेल तो उद्धव ठाकरे यांना मातोश्री मध्ये जाऊन भेटत आहे. उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून त्यांचे प्रबोधन करत आहेत. मग सामनाच्या अग्रलेखात नमूद केलेली उद्धव ठाकरे यांची महाप्रबोधन यात्रा ही मातोश्रीतून निघून मातोश्री भोवती प्रदक्षिणा घालून तेथेच विसर्जित होणार आहे का?? आणि त्याचीच जाहिरातबाजी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे का?? हे खरे प्रश्न आहेत.

 राहुल 1700 किलोमीटर फिरणार?

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची व्याप्ती तरी खूप मोठी आहे. त्याला प्रतिसाद किती मिळेल हा भाग अलहिदा. पण 1700 किलोमीटर एवढ्या यात्रेत राहुल गांधी ठिकठिकाणी असणार आहेत, हीच काँग्रेसजनांसाठी राजकीय संजीवनी देणारी बाब आहे. पण उद्धव ठाकरे यांची महाप्रबोधन यात्रा सुरूच व्हायची आहे. ती नेमकी कुठे?, कशी?, केव्हा?, जाणार याचे तपशील अजून तरी ठरलेले दिसत नाहीत. …आणि तरी देखील या भारत काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सामनाने अग्रलेखातून आदित्यच्या मुंबई पुरत्या निघालेल्या निष्ठा यात्रेला “संपूर्ण महाराष्ट्राने” दिलेला प्रतिसाद आणि उद्धव ठाकरे यांनी अद्याप न काढलेल्या महाप्रबोधन यात्रेची जाहिरातबाजी मात्र जोरात करून घेतली आहे!!

Saamna editorial parise rahul Gandhi’s bharat Jodo yatra, but moreover advertise aditya and Uddhav Thackeray’s yatras

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात