विशेष प्रतिनिधी
मुंबई : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राजकारणात चांगलाच रंग आलायं. कुठं शाब्दिक वार तर कुठं पलटवार.नुकताच नवा वसुली मंत्री कोण?, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला होता. त्यांच्या याच प्रश्नाला चाकणकर यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे. Rupali Chakankar Slam Chitra wagh over Anil Deshmukh Resign
चित्राताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण??, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे.
रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्ट करुन चित्रा वाघ यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. “चित्रा ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण?, चित्रा ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल, असा सल्ला देताना थोडा धीरज रखो , सब सच सामने आयेगा.!!”, असा गर्भित इशाराही चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसूली मंत्री कोण? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. तसेच एखादा चेहरा बदलल्याने महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली.
रुपाली चाकणकर यांचं उत्तर
“ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण??अहो ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल.थोडा धीरज रखो , सब सच सामने आयेगा.!!”
राजकारण म्हण्टल की असा वार होणार आणि पलटवार देखील होणारच. सच सामने येईल तेव्हा येईल तूर्तास हा शाब्दिक संघर्ष महाराष्ट्रातील राजकारणात चांगलीच फोडणी घालतोय.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App