विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rupali Chakankar सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या शिक्षणावरून टीका केली होती. रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, अजित पवार दहावी पास आहेत त्यांना काहीच कळत नसल्याची टीका दमानिया यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत अजित पवारांची बाजू मांडली. वडिलांच्या निधनामुळे अजित दादांना शिक्षण सोडावे लागले होते. यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून अतिशय संवेदनशील घटना असल्याचे चाकणकर यांनी म्हटले होते. यावरून आता अंजली दमानिया यांनी पुन्हा ट्विट करत यावर प्रत्युत्तर दिले आहे.Rupali Chakankar
रुपाली चाकणकर यांच्या ट्विटला उत्तर देताना अंजली दमानिया उपहासात्मक टीका करत म्हणाल्या, मग अजित पवारांनी कृषिमंत्री जरूर व्हावे. अर्थ मंत्रालय, हा खूप महत्त्वाचा आणि अतिशय गंभीर आहे. यातील सगळ्या बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास, ज्ञान असणे आवश्यक आहे, अशी खोचक टीका दमानिया यांनी केली आहे.Rupali Chakankar
मग अजित पवारांनी कृषी मंत्री जरूर व्हावे. अर्थ मंत्रालय, हा खूप महत्वाचा आणि अतिशय गंभीर आहे. ह्यातील सगळ्या बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास / ज्ञान असणे आवश्यक आहे. स्वित्झर्लंड हा देश ४१२८५ चौ किमी आहे आणि महाराष्ट्र ३०७७१३ चौ किमी आहे. म्हणजे आपले महाराष्ट्र… https://t.co/yE1hJSODWQ — Mrs Anjali Damania (@anjali_damania) October 13, 2025
मग अजित पवारांनी कृषी मंत्री जरूर व्हावे.
अर्थ मंत्रालय, हा खूप महत्वाचा आणि अतिशय गंभीर आहे.
ह्यातील सगळ्या बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास / ज्ञान असणे आवश्यक आहे.
स्वित्झर्लंड हा देश ४१२८५ चौ किमी आहे आणि महाराष्ट्र ३०७७१३ चौ किमी आहे. म्हणजे आपले महाराष्ट्र… https://t.co/yE1hJSODWQ
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) October 13, 2025
पुढे अंजली दमानिया म्हणाल्या, स्वित्झर्लंड हा देश 41285 चौ. किमी आहे आणि महाराष्ट्र 307713 चौ. किमी आहे, म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य हे स्वित्झर्लंड या देशाच्या तुलनेत 8 पट मोठे आहे. स्वित्झर्लंडची जीडीपी 83,33,000 कोटी आहे आणि महाराष्ट्राची 42,67,000 कोटी आहे, म्हणजे अर्ध्याने. महाराष्ट्रावर कर्ज आता 9,32,000 कोटी आहे. ते कसे कमी होणार? काही ब्ल्यू प्रिंट आहे का? असा प्रश्न देखील अंजली दमानिया यांनी चाकणकर यांना उद्देशून विचारला आहे.
रुपाली चाकणकर नेमके काय म्हणाल्या?
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर अजित पवारांची बाजू मांडताना म्हणाल्या, आदरणीय अजित दादा पवार यांच्या वडिलांचे हृदय विकाराने दुःखद निधन झाले. त्या वेळी अजितदादा कोल्हापूर येथे शिक्षण घेत होते. वडिलांच्या निधनानंतर दादांनी शिक्षण अर्ध्यात सोडले. त्यामुळे कोणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून ही त्यांच्या जीवनातील अतिशय संवेदनशील घटना आहे.
शिक्षण सोडून बारामतीमध्ये आल्यावर दादांनी शेती करायला सुरूवात केली, पोल्ट्री व्यवसाय वाढवला, वेगवेगळी पिके घेतली. मग त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला. गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनिअरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा काळाच्या पुढे बघण्याचा कायम राहिलेला आहे. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात एआय वापरण्यासाठी आग्रही असणारे अजितदादा पवार आहेत. त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकस दृष्टिकोनामुळेच, असे ट्विट चाकणकर यांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App