RSS supports : जातिगत जनगणनेला संघाचा पाठिंबा, पण त्यात राजकारण नको म्हटल्यावर लगेच काँग्रेसची टीका!!

t Congress criticized RSS

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात अत्यंत संवेदनशील मुद्दा बनलेल्या जातिगत जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक ( RSS  ) संघाने पाठिंबा दिला, पण त्यात राजकारण आणू नका, म्हटल्याबरोबर लगेच त्यावर काँग्रेसने टीका केली.

संघ परिवारातील संघटनाची तीन दिवसांची समन्वय बैठक केरळमध्ये झाली. त्या बैठकीत संघ शताब्दी निमित्ताने घ्यायच्या पंचसूत्री उपक्रमांवर व्यापक चर्चा झाली. त्याच बरोबर महिला सुरक्षा आणि जाती आरक्षण, जातिगत जनगणना या संवेदनशील मुद्द्यांवर देखील विचारविनिमय झाला.



देशातल्या विविध कल्याणकारी योजना, दलित, उपेक्षित विविध जाती, समुदायांच्या योजना यांच्यासाठी आवश्यक ती जातिगत जनगणना सरकारने करावी. पण त्या जनगणनेला निवडणुकीतला वापर हा आधार असता कामा नये. राजकारण चालवालया कोणत्याही राजकीय पक्षाने जातिगत जनगणनेचा वापर करू नये. कारण हिंदू समाजात जात अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. तो देशाच्या ऐक्य अखंडता आणि एकमत्मतेशीही संबंधित आहे, असे स्पष्ट मत संघाने व्यक्त केले. याची माहिती संघाचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी दिली.

मात्र कल्याणकारी योजनांसाठी जातिगत जनगणना हवी, पण त्यात राजकारण नको, असे संघाने म्हटल्याबरोबर काँग्रेसने संघाला आणि भाजप सरकारला जातिगत जनगणनेचे विरोधी ठरविले. संघाला जातिगत जनगणना नको आहे. कारण त्यांना दलित, आदिवासी, पिछड्यांना त्यांचे हक्क द्यायचे नाहीत असा आरोप काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडल वर केला, पण त्याचवेळी जातिगत जनगणना होईलच हे लिहून घ्या, असे आव्हान देखील काँग्रेसने केंद्र सरकार आणि संघाला दिले.

RSS supports caste census, but Congress criticized RSS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात