RSS : सरसंघचालकांचा हिंगोली औरंगाबाद दौरा ! नर्सी नामदेवांचे दर्शन घेऊन उद्या सायंकाळी येणार औरंगाबादेत ! 10 वर्षांनंतर प्रथमच दौरा …

सरसंघचालक मोहन भागवत 11 नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील नर्सी येथील श्री संत नामदेव महाराजांचे दर्शन घेऊन नांदेड येथील गुरुद्वाराचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ते औरंगाबादेत पोहोचतील.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबादः  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उद्यापासून म्हणजेच 11 ते 15 नोव्हेंबरदरम्यान हिंगोली-नांदेड- औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत.तब्बल 10 वर्षांनंतर सरसंघचालक औरंगाबादेत येत असल्याने आरएसएसच्या स्वयंसेवकामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी 2011 मध्ये सरसंघचालकांनी औरंगाबादमध्ये तीन दिवसांचा मुक्काम केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच ते 5 दिवसांच्या मुक्कामासाठी शहरात येत आहेत. आगामी काळात संघटनात्मक कार्यासंबंधीची बैठकांचे आयोजन या काळात केले जाईल. RSS: Sarsanghchalak’s Hingoli tour to Aurangabad! Narsi Namdeo will visit Aurangabad tomorrow evening! For the first time in 10 years …

हिंगोली- नांदेड -औरंगाबाद

सरसंघचालक मोहन भागवत 11 नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील नर्सी येथील श्री संत नामदेव महाराजांचे व गुरुद्वाराचे दर्शन घेऊन संध्याकाळी औरंगाबादेत येतील. याच दिवशी संघाच्या नगर स्तरावरील कार्यकर्त्यांचा सहकुटुंब एकत्रिकीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात सरसंघचालक मोहन भागवत हे पर्यावरण, सामाजिक समरसता आणि कुटुंब प्रबोधन या विषयांवर स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील.



12 नोव्हेंबरनंतर तीन दिवस प्रचारकांच्या बैठका

पुढील मुक्कामात सरसंघचालक 12,13 आणि 14 रोजी संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी विविध बैठका घेतील. पहिल्या दोन दिवसात प्रामुख्याने औरंगाबादमधील पूर्णवेळ कार्य करणाऱ्या प्रचारकांच्या आणि प्रांत कार्यकारिणी मंडळाच्या बैठका आणि काही स्वयंसेवकांच्या भेटी घेणार आहेत. 14 नोव्हेंबर रोजी संघाच्या विविध संस्था, संघटनांची समन्वय बैठक होईल. यात सरसंघचालक कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करतील. 15 नोव्हेंबर रोजी ते विमानाने हैदराबाद मार्गे कोलकत्याला रवाना होतील.

सर्व कार्यक्रम सिडकोतील अग्रसेन भवनमध्ये

सरसंघचालकांच्या पाच दिवसीय दौऱ्यातील सर्व महत्त्वाचे कार्यक्रम सिडकोतील अग्रसेन भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. आयोजन स्थळी केवळ निमंत्रितांनाच प्रवेश असेल. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी माहिती देवगिरी प्रांताचे संघचालक अनिल भालेराव आणि देवगिरी प्रांत कार्यवाह हरीश कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य अॅड. आशिश जाधवर, विश्व संवाद केंद्र संयोजक ओंकार शेलदरकर, शहर प्रचारप्रमुख चेतन पगारे यांची उपस्थिती होती.

RSS : Sarsanghchalak’s Hingoli tour to Aurangabad! Narsi Namdeo will visit Aurangabad tomorrow evening! For the first time in 10 years …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात