पुण्यात एटीएम फोडून २४ लाख रुपये लंपास; यवत येथील घटना; महाबँकेच्या शाखेचे नुकसान

वृत्तसंस्था

पुणे : पुणे – सोलापुर महामार्गाशेजारीच असलेले यवत (ता.दौंड) येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी तब्बल २३ लाख रुपये लंपास केले आहेत.Rs 24 lakh looted from ATM in Pune; Incident at Yavat; Loss of Mahabanka branch

पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी ही माहिती दिली. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी २३ लाख ८१ हजार ७०० रुपये लंपास केले आहेत.ए.टी.एम ठेकेदार विकास जालिंदर भगत यांनी यवत पोलिस स्टेशनला फिर्याद दिली.



अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी पाहणी केली.परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली. चोरटे दोन दुचाकीवर आल्याचे दिसत असून तपासासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक नागरगोजे करत आहे.

Rs 24 lakh looted from ATM in Pune; Incident at Yavat; Loss of Mahabanka branch

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात