विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manoj Jarange : पत्रकारांनी समजून घ्यावे की हुल्लडबाज आंदोलक आहेत की, सरकार आहे. हे समजून घ्या. मीडियाने मुख्यमंत्र्याला बोलले पाहिजे, गोरगरिब शेतकऱ्यांच्या पोराला बोललं नाही पाहिजे, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकारांना केले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. आंदोलनाला आझाद मैदानात परवानगी दिलेली असताना आंदोलक आझाद मैदान परिसरात आणि सीएसएम टर्मिनस येथे हुल्लडबाजी करत असल्याचे समोर आले आहे. या संबंधीच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांवरुन प्रसारित केल्या जात आहे.
यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांचा ऐकेरी भाषेत उल्लेख करुन मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीसांना आम्ही चार महिन्यांपूर्वी सांगितले होते की आम्ही मुंबईत येणार आहे, त्यापूर्वी आरक्षणाची मागणी सोडवा. महाराष्ट्राला अपुऱ्या बुद्धीचा मुख्यमंत्री लाभल्यामुळे महाराष्ट्रात असं होत आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला शुक्रवारी सुरुवात झाली. त्यानंतर शनिवार, रविवार हे दोन सुटीचे दिवस होते. त्यामुळे फ्लोरा फाऊंटन, सीएसएम टर्मिनस येथे फार मोठी गर्दी नव्हती. दक्षिण मुंबईतही फार गर्दी नव्हती. मात्र आज सोमवारी दक्षिण मुंबईतील विविध कार्यालये, सरकारी आणि खासगी अस्थापने, दुकाने सुरु झाली, तिथपर्यंत पोहोचणे कर्मचाऱ्यांना शक्य होत नव्हते. सीएसएम टर्मिनस आंदोलकांनी जणू ताब्यात घेतले असे स्वरुप सोमवारी सकाळपासून निर्माण झाले. रेल्वे स्थानकात खेळ खेळले जाऊ लागले. जेवण आणि मुक्काम तिथेच करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्य इमारती समोरील विजेच्या खांबावर चढून नाच करण्यात आल्याचेही दिसले, या संबंधीचे वृत्तवाहिन्यांनी प्रकाशित केल्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी आंदोलकांना हुल्लडबाज म्हणू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुल्लडबाज आहे, असे वक्तव्य केले.
मनोज जरांगे म्हणाले की, “सर्वांनी शांततेने संयमाने आंदोलन करावे. माझी शेवटची विनंती आहे की, शांततेने आंदोलनात सहभागी व्हा. जर तुम्ही ऐकत नसाल तर तुम्ही मराठा आंदोलक आहे की नाही, हे आम्हाला ठरवावे लागेल.
मनोज जरांगे म्हणाले की, “सर्वांनी शांततेने संयमाने आंदोलन करावे. माझी शेवटची विनंती आहे की, शांततेने आंदोलनात सहभागी व्हा. जर तुम्ही ऐकत नसाल तर तुम्ही मराठा आंदोलक आहे की नाही, हे आम्हाला ठरवावे लागेल.”
मनोज जरांगे म्हणाले की, “मराठा आंदोलक हुल्लडबाजी करत नाही. सरकार हुल्लडबाजी करत आहे. चार महिन्यांपूर्वी सरकारला सांगितले होते की आम्हाला मुंबईला यायचे नाही. आमच्या आरक्षणाची मागणी मान्य करा. मात्र हा माजलेला. मदमस्त मुख्यमंत्र्याने जाणूनबुजून मराठ्यांचा प्रश्न सोडवला नाही. अशांतता व्हावी म्हणून हे असे केले. मुख्यमंत्री कोणाचेच ऐकत नाही. मी सांगेल तसंच वागलं पाहिजे, असा एकलखुरा मुख्यमंत्री आहे. आपऱ्या बुद्धीचा मुख्यमंत्री लाभल्यामुळे महाराष्ट्रात असं होत आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App