दिवसभराची तोंडी वक्तव्ये आणि त्याचा प्रत्यक्ष कृतीत परिणाम!!; वाचा नेमका काय??

नाशिक : दिवसभराची तोंडी वक्तव्ये आणि त्याचा प्रत्यक्ष कृतीत परिणाम!!, हे शीर्षक वाचून थोडे बुचकळ्यात पडल्यासारखे होईल, पण तसे अजिबात नाही. Rohit pawar’s yuva sangharsh yatra stalled, add new political fuelling to maratha reservation agitation

आज 27 ऑक्टोबर 2023 रोजी दिवसभरामध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थिती विषयी जी वक्तव्ये झाली आणि दिवसा अखेरीस जो प्रत्यक्ष कृतीतला परिणाम दिसला, त्याचेच या शीर्षकात वर्णन केले आहे.

आज दिवसभरामध्ये मराठा आरक्षण या विषयावर मनोज जरांगे पाटील यांचे वक्तव्य आले. त्यांनी मोदींचे विमान मराठा समाजाने शिर्डीत उतरूच दिले नसते, असे वक्तव्य केले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबरच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील टार्गेट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गोरगरिबांची गरज उरली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

जो शब्द पाळताच येत नाही, तो शब्द देऊ नये, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हाणला.

शिर्डीतल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या कृषिमंत्री पदाच्या कारकिर्दीवर आकडेवारीचा अहवाला देऊन टीका केली होती. मात्र ही टीका अजित पवारांसमोर केल्याने शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे नेते चिडले आणि अजित पवारांनी मोदींचे ऐकूनच घ्यायला नको होते. तिथून उठून जायला हवे होते, असा सल्ला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.

अनिल देशमुखांच्या या सल्ल्याला रोहित पवारांनी देखील दुजोरा दिला. पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केलेली टीका अजितदादांनी ऐकूनच घ्यायला नको होती आणि ऐकून घेतली तर त्यांचा प्रतिवाद करायला हवा होता, असे रोहित पवार म्हणाले.



खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्ट लिहून देशावरच्या कर्जाचा डोंगर दुप्पट झाला आहे. तो 173 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे नमूद करत मोदी सरकारच्या काळात कशी आर्थिक दुरवस्था झाली याचे वर्णन केले.

मात्र दिवसाच्या सुरुवातीला त्यांनी मोदींच्या पवारांवरच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मोदींनी पवारांची अनेकदा स्तुती केली आहे. त्यांना पद्मविभूषण किताब दिला आहे. पण काल त्यांनी पवारांच्या कृषिमंत्री पदावरच प्रश्नचिन्ह लावले. त्यांना महाराष्ट्रात येऊन पवारांचे नाव घ्यावे लागते. इतना तो हक बनता है. राजकारणात असे चालतेच, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.

आंदोलनाचा परिणाम

दिवसभराच्या या तोंडी वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले. काही ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंचे फोटो सरकारी कार्यालयांमधून उतरविले, तर सोलापुरात मराठा आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळला. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना मराठा आंदोलकांनी गावबंदी केली. मंत्री हसन मुश्रीफांना घेराव घातला, तर नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गाड्यांची तोडफोड केली.

रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा स्थगित

या सर्व घटना घडामोडींचा अत्यंत महत्त्वाचा परिणाम सायंकाळी समोर आला. शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा मध्येच स्थगित केल्याचे जाहीर केले. मराठा आंदोलकांनी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी केल्याने त्याचा परिणाम युवा संघर्ष यात्रेवर झाल्याचा रोहित पवारांनी इन्कार केला.

पण एकीकडे मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन राजकीय इंधन देऊन तीव्र करायचे, तर दुसरीकडे रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा देखील सुरू ठेवायची ही राजकीय कसरत शरदनिष्ठ राष्ट्रवादीला अवघड होत चालली होती. या पार्श्वभूमीवर दोन पैकी एक करणेच शक्य होते. त्यामुळे अखेर रोहित पवारांचीच युवा संघर्ष यात्रा स्थगित करावी लागल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले. दिवसभराच्या तोंडी वक्तव्यानंतर हा महत्त्वाचा राजकीय परिणाम सायंकाळी महाराष्ट्रात दिसला. मराठा आंदोलनाला पुढचे राजकीय इंधन पुरवण्याची ही नांदी आहे

Rohit pawar’s yuva sangharsh yatra stalled, add new political fuelling to maratha reservation agitation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात