नाशिक : कुठेही कुठलेही आंदोलन दिसले, की रोहित पवार त्यात घुसलेच!!, असे चित्र आज पुन्हा एकदा समोर आले. मुंबईत दादर मधल्या कबूतर खान्यासाठी जैन समाजाने कबूतर खान्यापाशी आंदोलन केले. जैन समाज आणि पोलीस प्रशासन समोरासमोर आले. या आंदोलनावरून बऱ्याच राजकीय टीका टिपण्या झाल्या. मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करून तोडगा काढायचे आश्वासन दिल्यावर जैन समाजाने आंदोलन मागे घेतले. पण जैन समाजाने आंदोलन मागे घेतल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आंदोलन स्थळी पोहोचले तिथल्या जैन समाजातल्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली. जैन समाजाची भावना समजून घेतली पाहिजे, असा उपदेश त्यांनी फडणवीस सरकारला केला. Rohit Pawar
पण जोपर्यंत दादरच्या कबूतर खान्याच्या मुद्द्यावर जैन समाजाने आंदोलन केले नव्हते, तोपर्यंत तो विषय रोहित पवारांच्या गावीही नव्हता. त्यांनी त्या मुद्द्यावर कुठलेही भाष्य केले नव्हते. पण जैन समाजाने आंदोलन केल्याबरोबर रोहित पवार आपल्या जुन्या राजकीय सवयीनुसार तिथे पोहोचले आणि आंदोलनात घुसले.
– एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात घुसखोरी
आत्तापर्यंत रोहित पवारांनी अशा अनेक आंदोलनांमध्ये घुसखोरी केली. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले त्यानंतर रोहित पवार आणि सुप्रिया सुळे त्यामध्ये घुसले एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी शरद पवारांच्या कडे नेले शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविला असे दाखविण्यात आले. पण एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करेपर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या समस्यांची जाणीव झाली नव्हती किंवा रोहित पवार देखील विद्यार्थ्यांना भेटायला गेले नव्हते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून आंदोलन केल्यानंतर रोहित पवार त्यामध्ये हस्तक्षेप करायला पोहोचले होते.
– शिक्षकांच्या आंदोलनात घुसखोरी
मुंबईमध्ये विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी पगार वाढीसाठी आंदोलन केले. या शिक्षकांनी फडणवीस सरकारशी चर्चा सुरू केली. फडणवीस सरकारने राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना शिक्षकांशी चर्चा करायला पाठविले. पण याच दरम्यान रोहित पवार शिक्षकांच्याही आंदोलनात घुसले. तिथे त्यांनी शरद पवारांना नेले त्यानंतर उद्धव ठाकरेंना नेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिक्षकांचा प्रश्न सुटला असे भासविले. प्रत्यक्षात फडणवीस सरकारने शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आधीच दिले होते. शिक्षकांचे आंदोलन थांबवताना गिरीश महाजन यांनी नेमकेपणाने याच बाबीचा उल्लेख केला होता.
– कबूतर खान्याच्या आंदोलनात घुसखोरी
त्यानंतर आज 6 ऑगस्ट 2025 रोजी कबूतर खान्याच्या प्रश्नावर जैन समाजाने आंदोलन केले. जैन समाजाच्या महिलांनी कबूतर खान्यावरच्या ताडपत्री आणि बांबू हटवून कबुतरांना खायला घातले. त्यावेळी कबूतर खान्यापाशी थोडा तणाव निर्माण झाला होता. पण मंत्री प्रभात लोढा आणि जैन समाज मंदिराचे विश्वस्त यांनी तो प्रश्न संयमाने हाताळला. जैन समाजाने आंदोलनही मागे घेतले, पण त्यानंतर रोहित पवार जैन समाजाच्या आंदोलनात घुसले. त्यांनी जैन समाजाच्या आंदोलकांशी चर्चा केली. फडणवीस सरकारला उपदेश केला. पण यातून नेहमीच्या राजकीय सवयीप्रमाणे रोहित पवारांनी दुसऱ्यांच्या आंदोलनात घुसखोरी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App