सोलापूरात आधी वाद तयार करायची रोहित पवारांची खेळी; प्रणिती शिंदेंच्या प्रत्युत्तरानंतर वादावर पडदा टाकायचा रोहितदादांचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सोलापूर लोकसभा मतदारसंघावर आधी दावा ठोकायचा. त्यावर वाद तयार झाला आणि प्रत्युत्तर आले की त्यावर पडदा टाकायचा प्रयत्न करायचा, अशी चाल राष्ट्रवादी काँग्रेसने खेळली आहे. Rohit Pawar’s double game, ncp first claimed on NCP loksabha constituency, but backtracked after praneeti shined gave befitting reply

सोलापूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांचे नातू रोज आमदार रोहित पवार यांनी आधी दावा ठोकला. परंतु, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर आल्यानंतर मात्र रोहित पवारांनी त्या वादावर पडदा टाकायचा प्रयत्न केला.

काहीच दिवसांपूर्वी आमदार रोहित पवारांनी सोलापूर मध्ये येऊन काँग्रेसच्या अर्थात सुशीलकुमार शिंदे यांच्या हक्काच्या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा ठोकला होता. सुशील कुमार शिंदे यांचा त्या लोकसभा मतदारसंघातून दोनदा पराभव झाला याची आठवण रोहित पवारांनी करून दिली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होतीच. त्या अस्वस्थतेला आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिक्रियेच्या रूपाने वाट मिळाली.

प्रणिती शिंदे यांना पत्रकारांनी रोहित पवारांच्या वक्तव्याबद्दल विचारतात त्यांनी कोण रोहित पवार? मी नाही ओळखत, असे सुरुवातीला म्हटले. पण आमदार रोहित पवार असा पत्रकारांनी उल्लेख केल्यानंतर ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या थोडा पोरकटपणा आहे. पण नंतर ते मॅच्युअर होतील, असा जोरदार टोला हाणला. हा टोला हाणल्यानंतर रोहित पवारांच्या एकूण प्रकरणातले गांभीर्य लक्षात आले आणि प्रणिती शिंदे या आपल्या ज्येष्ठ भगिनी आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपण आपापसात वाद करत बसण्यापेक्षा आपण बेरोजगारी सारख्या प्रश्नावर आपली ताकद एकवटून लढा देऊ, असे ट्विट केले.

पण प्रणिती शिंदे यांना ज्येष्ठ भगिनी म्हणणाऱ्या रोहित पवारांनी मूळातच त्यांच्या आजोबांच्या पिढीतले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आणि काँग्रेसच्या हक्काच्या लोकांचा मतदारसंघावर दावा दावा ठोकला होता तेव्हा सुशीलकुमार शिंदे हे आपल्या आजोबांच्या वयाचे आहेत हे रोहित पवारांच्या लक्षात आले नाही का??, हा खरा प्रश्न आहे.

त्याचबरोबर रोहित पवारांनी जरी ट्विट करून प्रणिती शिंदे यांना ज्येष्ठ भगिनींनी म्हटले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि रोहित पवारांच्या समर्थकांनी मात्र सोलापुरात पोस्टर्स झळकवून रोहित पवारांच्या दाव्याचे समर्थनच केले आहे. त्यामुळे राजकीय रेटारेटी करून काँग्रेसचा मतदार संघ राष्ट्रवादीकडे खेचून घेण्याचा हा इरादा तर नाही ना??, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक मतदारसंघांमध्ये हा प्रयत्न करून काँग्रेसला पिछाडीवर ढकलल्याचा अनुभव अनेकांचा आहे.

या राजकीय पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मुद्द्यावर निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकायचा प्रयत्न केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाकीचे नेते नेमकी काय भूमिका घेतात आणि त्या भूमिकेला काँग्रेसचे नेते कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Rohit Pawar’s double game, ncp first claimed on NCP loksabha constituency, but backtracked after praneeti shined gave befitting reply

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात