विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे उपोषण आंदोलन महाराष्ट्रात तीव्र होत असताना शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली युवा संघर्ष यात्रा स्थगित केली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र होत असताना मराठा क्रांती मोर्चा ने सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी केली आहे. त्याचा परिणाम सर्व राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांवर होत आहे. त्यातूनच रोहित पवारांनी ही यात्रा स्थगित केल्याचे बोलले जात आहे, पण रोहित पवारांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. rohit pawar yuva sangharsha yatra
मराठा आरक्षण आंदोलन तीव्र होत असताना जरांगे पाटलांनी आपल्या टीकेचा सर्व रोख प्रामुख्याने सत्ताधारी पक्षांवरच ठेवला आहे. मराठा आंदोलन नेत्यांना गावबंदी करत आहेत. पण त्यातही प्रामुख्याने भाजप, शिंदे शिवसेना, आणि अजितनिष्ठ राष्ट्रवादी यांनाच प्रामुख्याने त्याचा फटका बसतो आहे. शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस बाबत मात्र ते “सॉफ्ट” भूमिकेत आहेत.
या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सर्व प्रकारचा राजकीय इंधनपुरवठा शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच होत असल्याची चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे.
अशा स्थितीत जरांगे पाटलांचे आंदोलन तीव्र करायचे आणि त्याचवेळी रोहित पवारांची युवा संघर्ष यात्राही सुरू ठेवायची ही राजकीय कसरत शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसला अवघड ठरत होती. त्यामुळे अखेरीस रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पण स्वतः रोहित पवारांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. मराठा समाजातले युवक आत्महत्या करत असताना आपण ही यात्रा पुढे घेऊन जाऊ शकत नाही, असे वक्तव्य रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केले. मराठा युवकांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्यामुळे महाराष्ट्र अशांत झाला आहे. स्वाभिमानी महाराष्ट्र शांत व्हावा यासाठी आम्ही आहे त्या टप्प्यावर यात्रा स्थगित करत आहोत. मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये युवक आम्हाला येऊन भेटत आहेत, असे रोहित पवारांनी सांगितले.
पण एकीकडे जरांगे पाटलांचे आंदोलन आणि दुसरीकडे युवा संघर्ष यात्रा ही राजकीय कसरत अवघड ठरत असल्यानेच अखेरीस रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा स्थगित झाल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App