नाशिक : काकाला चुलीत घालायला पुतण्या तयार; “पवार संस्कारांची” दिसायची राहिली होती हीच किनार!!, असं म्हणायची वेळ शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या सोशल मीडिया पोस्ट मुळे आली. Rohit Pawar
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई भाजपच्या मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभात बोलताना भाजपची स्वबळाची भूमिका मांडली. त्यामध्ये त्यांनी भाजपला आता कुबड्यांची गरज नाही एवढे एकच वक्तव्य केले. त्यावरून विरोधकांनी महाराष्ट्रात मोठा राजकीय गहजब माजवला. पण रोहित पवारांनी सगळ्या विरोधकांच्या पुढे जाऊन आपल्या काकालाच भाजपची कुबडी ठरवून त्यांना चुलीत घालायची तयारी केली. भाजपला कुबड्यांची गरज नाही. त्यामुळे त्या चुलीत घाला, असे काही अमित शाह म्हणाले नव्हते. Rohit Pawar
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती नसल्याने बोगस मतदारयाद्यांचा फटका बसून गेम होईल या भीतीने सत्तेतील इतर दोन मित्रपक्ष प्रचंड चिंतेत पडले आहेत. या चिंतेतूनच अनेक आमदारांची खदखद आता समोर येत आहे. कालचा आमचा मोर्चा बघून तर सत्ताधारी इतर दोन पक्षातील काहींचे फोन आले… — Rohit Pawar (@RRPSpeaks) November 2, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती नसल्याने बोगस मतदारयाद्यांचा फटका बसून गेम होईल या भीतीने सत्तेतील इतर दोन मित्रपक्ष प्रचंड चिंतेत पडले आहेत. या चिंतेतूनच अनेक आमदारांची खदखद आता समोर येत आहे. कालचा आमचा मोर्चा बघून तर सत्ताधारी इतर दोन पक्षातील काहींचे फोन आले…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 2, 2025
– रोहित पवारांची सोशल मीडिया पोस्ट
पण रोहित पवारांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा तसा श्लेष काढून सोशल मीडिया पोस्ट लिहिली. या सोशल मीडिया पोस्ट मधून त्यांनी भाजपवरची सगळी भडास काढून घेतली. कारण भाजपने महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीत अजित पवारांना तडजोड करायला लावून त्यांची अध्यक्षपदावरची निवड सुकर करून दिली अजित पवारांना आता दोन वर्षे अध्यक्ष राहता येणार असून त्यांच्यानंतर अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लावावी लागणार आहे. महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन मधली अजित पवारांची मक्तेदारी उतरणीला लागल्याने रोहित पवारांनी तो राग सोशल मीडिया पोस्ट लिहून काढला.
मित्र पक्षांच्या प्रत्येक गोष्टीत भाजपने हस्तक्षेप केला म्हणून महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अजित पवारांना दोनदा बैठका घ्याव्या लागल्या, तरी सुद्धा तडजोड करावी लागली. सर्वच ठिकाणी भाजप हस्तक्षेप करतोय भाजपसाठी दोन्ही मित्र पक्षांची उपयुक्तता संपली असल्याची चिन्हे दिसू लागलीत. अमित शहा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुबड्या काढून फेकण्याची ही नांदी म्हणावी लागेल. आता या कुबड्या अडकवल्या जातील की चुलीत पेटवल्या जातील हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे रोहित पवारांनी लिहिले.
कुबड्यांच्या नावाखाली आपण ज्या काकांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे निवडून आलो, त्या काकांना चुलीत घालतो आहोत, याचे साधे भान सुद्धा रोहित पवारांना राहिले नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय पोस्ट लिहिण्याच्या नादात आपल्या काकांनाच कुबड्या म्हणून चुलीत घातले.
महाराष्ट्राला आतापर्यंत “पवार संस्कारांचे” विविध रंग अनेकांनी दाखविले, पण काकांनाच चुलीत घालण्याचा रंग मात्र रोहित पवारांनी दाखविला. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या निमित्ताने पवार संस्कारांचा हा ही रंग महाराष्ट्राला दिसून आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App