विशेष प्रतिनिधी
मुंबई : अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच रोहित पवार समर्थक नगराध्यक्षा उषा राऊत यांनी कर्जत जामखेड मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. लोकप्रतिनिधी, नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या समन्वय राहिला नाही. त्यामुळे अवघ्या अडीच वर्षांमध्ये आमदार रोहित पवारांना कर्जत जामखेडची सत्ता गमवावी लागली.
कर्जत जामखेडच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांनी अडीच वर्षे पदावर राहिल्यानंतर देखील राजीनामा दिला नाही त्यामुळे नाईलाजाने त्यांच्या विरोधात तो अविश्वास ठराव आढावा लागला. मतदानाची प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच श्रीमती राऊत यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्या अविश्वास ठरावाला सामोऱ्याच गेल्या नाहीत. त्यामुळे मतदान प्रक्रिया घेण्याची वेळच आली नाही.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी कायदा बदलला म्हणून आपल्याला राजीनामा द्यावा लागला, असा ठपका श्रीमती राऊत यांनी राम शिंदे यांच्यावर ठेवला. पण मुळात राम शिंदे यांनी असा कायदा बदलण्याचा मुद्दाच उद्भवत नाही, कारण कायदा बदलणे हे त्यांच्या एकट्याच्या हातात नाही. हे मात्र श्रीमती राऊत यांनी लक्षातच घेतले नाही. उलट उषा राऊत यांनी अडीच वर्षानंतर राजीनामा द्यायला हवा होता, पण तो दिला नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध नाईलाजाने अविश्वास ठराव आणावा लागला होता, असा खुलासा कर्जत जामखेड मधले नगरसेवकांचे गटनेते संतोष मेहत्रे यांनी केला.
उषा राऊत यांच्या विरोधात 17 पैकी 15 नगरसेवक असल्याचे बोलले जात होते. आपण बहुमत गमावले असले तरी राजीनामा द्यायचा नाही, अशी भूमिका त्यांनी रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला घेतली होती. काल रात्री कर्जत जामखेड मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि आज सकाळी उषा राऊत यांनी प्रत्यक्ष मतदानाला सामोरे जाण्यापूर्वीच पीठासीन अधिकारी नितीन पाटील यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा सोपविला. त्यामुळे कर्जत जामखेड नगरपंचायतीतले रोहित पवारांचे राजकीय वर्चस्व सध्यातरी संपुष्टात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App