उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा बँकेच्या १० जागांची मतमोजणी सुरू आहे.Rohini Khadse wins Jalgaon District Bank election
विशेष प्रतिनिधी
जळगाव: राज्यभरात सर्वत्र निवडणुकांचे वातावरण सुरू आहे. राजकीय दृष्ट्या जळगाव जिल्हा बँक महत्वाची मानली जाते. दरम्यान जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारनेच बाजी मारल्याचे दिसत आहे.उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा बँकेच्या १० जागांची मतमोजणी सुरू आहे.
यावेळी जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. भाजपला मात्र एका जागेवरच समाधान मानावे लागले आहे. २१ जागांपैकी ११ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आले आहे, ७ जागांवर शिवसेना निवडून आले तर २ जागांवर काँग्रेस निवडून आले आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा देखील एकतर्फी विजय झाला आहे.
ओबीसी महिला राखीव मतदारसंघातून रोहिणी खडसे यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की हा विजय म्हणजे गेल्या ६ वर्षांत केलेल्या कामाची पावती आहे. यापुढंही जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार अशी ग्वाही देखील रोहिणी खडसे यांनी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App