विशेष प्रतिनिधी
पुणे :Rohini Khadse रेव्ह पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे मंगळवारी स्वतः काळा कोट घालून कोर्टात पोहोचल्या. यावेळी त्यांनी प्रांजल यांच्यावतीने युक्तिवाद केला नाही. पण त्या पूर्णवेळ कोर्टात हजर होत्या. दरम्यान, प्रांजल यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी ईशा सिंग नामक तरुणीच्या माध्यमातून प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप केला आहे.Rohini Khadse
पुणे पोलिसांनी रविवारी पहाटे खराडी येथील फ्लॅटवर धाड टाकून प्रांजल खेवलकर यांच्यासह 7 जणांना अटक केली होती. या सर्वांवर रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप होता. प्रांजल हे रोहिणी खडसे यांचे पती तथा एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. आज या प्रकरणातील आरोपींची 2 दिवसांची पोलिस कोठडी संपुष्टात आली. त्यामुळे त्यांना पुणे कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी रोहिणी खडसे स्वतः सुनावणीसाठी काळा कोट घालून हजर होत्या. त्यांनी कोर्टात आपल्या पतीकडून या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम जाणून घेतला. त्या बराचवेळ त्यांच्याशी संवाद साधत होते.Rohini Khadse
मी योग्यवेळी भूमिका मांडेन – रोहिणी खडसे
सुनावणीनंतर कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला. त्यानंतर कोर्टरुमबाहेर पडताना पत्रकारांनी रोहिणी खडसे यांना घेरले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधण्यास नकार दिला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. मी योग्यवेळी आपली विस्तृत भूमिका मांडेल, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे याही काळा कोट घालून उपस्थित होत्या.
पोलिसांचा महिला आरोपींच्या पोलिस कोठडीस विरोध
आजच्या सुनावणीत पोलिसांनी आरोपींची पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. प्रस्तुत प्रकरणात राहुल नामक एका नवीन व्यक्तीचे धागेदोरे सापडलेत. तो हुक्का भरण्याचे काम करत होता. पोलिसांना त्याचा शोध घ्यायचा आहे. अंमली पदार्थ कुठून आणले याविषयी आरोपी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्याचीही पोलिसांना चौकशी करायची आहे. 7 पैकी 2 महिला आरोपींच्या पोलिस कोठडीची गरज नाही. त्यांना न्यायालयीन कोठडी दिली जावी. पण पुरुष आरोपींच्या अधिक चौकशीची गरज असल्याने त्यांना पोलिस कोठडी दिली जावी, अशी मागणी पोलिसांनी कोर्टाकडे केली.
ईशा सिंगच्या माध्यमातून खेवलकरांना अडकवले – ठोंबरे
त्यावर प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी जोरदार हरकत घेतली. प्रस्तुत प्रकरणातील 2 महिला आरोपींकडे अंमली पदार्थ देऊन प्रांजल यांना या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ईशा सिंग नामक महिला आरोपीच्या पर्समध्ये सिगारेटच्या रिकाम्या पाकिटात कोकेन सापडले आहे. या प्रकरणात तिला प्लांट करण्यात आले होते. त्यानंतरही पोलिस या दोन्ही महिला आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करत आहेत. पण प्रांजल यांनी अंमली पदार्थांचे सेवन केले नाही. त्यांच्याकडे तसे पदार्थ सापडलेही नाहीत. यासंबंधीचा रिपोर्ट जाणिवपूर्वक लांबवण्यात येत आहे, असे ते पोलिसांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App