विशेष प्रतिनिधी
परभणी : Parbhani परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची काच मनोरुग्णाने फोडली. त्यावरून संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांसमक्ष या व्यक्तीला अमानुष मारहाण केली. पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याचा जीव वाचला. सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. सोपान दत्तराव पवार (४५) असे आरोपीचे नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला अटक करून रुग्णालयात दाखल केले.Parbhani
दरम्यान, या संतप्त जमावाने जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे स्टेशन परिसरात रास्ता रोकोे केला. सायंकाळी ७ च्या सुमारास शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. काही हुल्लडबाजांनी गांधी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर, आयटीआय परिसरातील दुकानांवर दगडफेक केली. रस्त्यावर उभ्या वाहनांचेही नुकसान केले. परिस्थिती चिघळल्याने पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण केले. जवळच असलेल्या रेल्वे स्टेशनमध्येही जमाव घुसला होता. त्यांनी स्थानकावर आलेली नंदीग्राम एक्स्प्रेस रोखून संताप व्यक्त केला. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना बाहेर काढल्यानंतर रेल्वे पुढे गेली.
आज परभणी, गंगाखेडमध्ये बंदची हाक
संविधान प्रतिकृती विटंबना झाल्याची बातमी काही वेळातच सोशल मीडियाद्वारे परभणी जिल्ह्यात पोहोचली. त्याचे पडसाद गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, सेलू या तालुक्यांतही उमटले. या भागातही जमावाने एकत्र येऊन घटनेचा निषेध केला. परभणी व गंगाखेड शहरात विविध संघटनांच्या वतीने बुधवारी (११ डिसेंबर) बंदची हाक देण्यात आली आहे. पोेलिसांनी शहरासह जिल्हाभरात अतिरिक्त कर्मचारी तैनात करून बंदोबस्त वाढवला आहे. रात्री उशिरापर्यंत कुणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता. रात्री परिस्थिती नियंत्रणात आली असून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी केले.
असल्याची पोलिसांची माहिती
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीवरील काच फुटल्यानंतर कपड्याने ही प्रतिकृती झाकून ठेवण्यात आली. तेथे पोलिस बंदोबस्त तैनात केला. विटंबना करणारा सोपान पवार याला जमावाने अमानुषपणे लाकडी दांडक्याने मारहाण केली. पेट्रोल टाकून जाळण्याचाही प्रयत्न केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App