छत्रपती संभाजीनगरातील किराडपुऱ्यात दंगल : राम मंदिराबाहेरची कमान जाळली, गोळीबारात एक जखमी, पोलिसांच्या 9 गाड्या जाळल्या

प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : येथील किराडपुऱ्यात दोन समुदायांमध्ये प्रचंड हिंसाचार झाला आहे. किराडपुरा येथील राममंदिराबाहेर दुपारी 12.30 वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यानंतर काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहनेही पेटवून दिली. याशिवाय बॉम्बस्फोटाची घटनाही समोर आली आहे.Riots at Kiradpura in Chhatrapati Sambhajinagar: Arch outside Ram temple burnt, one injured in firing, 9 police cars burnt

सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. किराडपुरा भागात पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बाब रात्री साडे बाराची आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंदिराबाहेर हिंसाचार सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. हे पाहताच दोन्ही बाजूचे लोक मोठ्या संख्येने जमा झाले आणि त्यांनी एकमेकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. गाड्या फोडण्यात आल्या. यादरम्यान दगडफेक आणि बॉम्बही फेकण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परिसरात अजूनही तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

हिंसाचाराच्या घटनेनंतर काही मुस्लिम धर्मगुरू जाळपोळीच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

यादरम्यान स्थानिक खासदार इम्तियाज जलील स्वतः औरंगाबादच्या किराडपुरा राम मंदिरात पोहोचले आणि त्यांनी सांगितले की, राम मंदिरात कोणताही प्रकार घडला नाही. जी काही घटना घडली आहे ती राम मंदिराबाहेरच घडली आहे.

छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त सांगतात की, दोन तरुणांमधील या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली आणि पोलिसांसह अनेक वाहने जाळण्यात आली. पोलिसांनी बळाचा वापर करून सर्वांना हटवले असून सध्या शांतता आहे. पोलिसांनी सर्व लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

आज सकाळी पोलिस कर्मचारी हिंसाचाराच्या ठिकाणी साफसफाई करताना दिसत आहेत. सध्या शहरात शांतता असली तरी रस्त्यावर फार कमी लोकांची ये-जा दिसून येत आहे.

आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत रस्ता बंद

स्थानिकांच्या माहितीनुसार, जमाव हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. हा गोळीबार दोन तीन वेळा ऐकू आल्याचे रहिवाशांनी सांगितले. आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत सर्व पोलिस रस्ता पोलिसांनी बंद केला. त्याशिवाय बहुतांश नागरिकांच्या घरावर दगडफेक झाली. तेथील लोकांना घराबाहेर येण्यासाठी नागरिक उद्युक्त करत होते. ३.३० वाजेपर्यंत जमाव नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.

Riots at Kiradpura in Chhatrapati Sambhajinagar: Arch outside Ram temple burnt, one injured in firing, 9 police cars burnt

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात