जरी मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या प्रवासासाठी शिक्षण विभागाने आदेश काढले तरी त्याला कोणीही जुमानत नाही. म्हणून लोकल प्रवासासाठी सरकारनेच आदेश जारी करावेत अशी मागणी केली आहे.Resolve the issue of local travel before starting school, the teachers’ council demanded in a letter to Chief Minister Uddhav Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : हळूहळू सर्व शाळा सुरू होत आहेत. मुंबई आणि जवळच्या परिसरातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये ४ ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहेत; परंतू त्याआधी शिक्षक-शिक्षकेतर , कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या लोकल प्रवासासाठी स्वतंत्र आदेश जारी करावेत, अशी मागणी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
मुंबई आणि परिसरातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मुंबईजवळ असलेल्या ठाणे व पालघर जिल्ह्यांतील वसई, कर्जत, कसारा, बदलापूर, कल्याण, टिटवाळा आदींसह नवी मुंबई-पनवेल परिसरातून शाळांमध्ये येत असतात.
त्यामुळे त्यांच्या लोकल प्रवासाबाबत वेगळे आदेश काढण्याची मागणी शिक्षक आमदार नागो गाणार आणि शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.जरी मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या प्रवासासाठी शिक्षण विभागाने आदेश काढले तरी त्याला कोणीही जुमानत नाही. म्हणून लोकल प्रवासासाठी सरकारनेच आदेश जारी करावेत अशी मागणी केली आहे.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासासाठी आतापर्यंत कोणत्याही निश्चित सूचना सरकारकडून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण असून ते तातडीने दूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App