विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात संविधानानुसार आरक्षण असले तरी सध्या मात्र शिक्षणातले आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपले आहे. कारण शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण झाले आणि नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने दिल्या जातात म्हणून तिथे आरक्षण शिल्लक राहिलेले नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्याचवेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडताना, भाजप म्हणत आहे धर्म संकटात आहे, पण ओबीसींनो समजून घ्या, धर्म संकटात नाही, तर ओबीसींचे आरक्षण संकटात आहे, असे सांगितले.
मराठवाड्यातील नांदेडमध्ये आयोजित केलेल्या भटके विमुक्त ओबीसी एल्गार महासभेमध्ये ते बोलत होते. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आज शिक्षणातले आरक्षण हे संपलेले आहे. नोकरीतले आरक्षण संपलेले आहे. कारण की, शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण केले आहे. नोकऱ्या ह्या कंत्राटी पद्धतीने दिल्या जात आहे. आता जे आरक्षण आहे ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगर पालिकापुरते राहिलेले आहे.
ज्या प्रकारे बाहुबली चित्रपटात कटप्पाने पाठीत खंजीर खुपसून बाहुबलीचा जीव घेतला. त्याचप्रमाणे बहुसंख्य ओबीसी जो बाहुबली आहे, त्याच्या पाठीत भाजपने खंजीर खुपसला. आपला शत्रू भाजप, महायुती आणि प्रस्थापित पक्ष आहेत, हे ओबीसींनी ओळखावे, असे ओबीसी नेते अविनाश भोसीकर यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App