विशेष प्रतिनिधी
पुणे : सह धर्मादाय आयुक्त कार्यालयात गणराज्य दिन पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे पदाधिकारी, वकील व कार्यालयीन अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या समवेत उत्साहात साजरा करण्यात आला. Republic Day in full swing at the joint charity commissioner’s office
मुख्य समारंभात सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्या प्रसंगी सह आयुक्त सुनिता तरार, सहाय्यक आयुक्त अमरदीप तिडके, सहाय्यक आयुक्त राहूल चव्हाण, सहाय्यक आयुक्त राणी मुक्कावार, सहाय्यक आयुक्त प्रशांत चव्हाण उपस्थित होते.
राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात येऊन राष्ट्रगीताचे मंगलगान करण्यात आले. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार, खजिनदार ॲड. रजनी उकरंडे, ज्येष्ठ ॲड. दिलीप हांडे, माजी अध्यक्ष ॲड. मुकेश परदेशी, माजी सचिव ॲड. राजेश ठाकूर, ॲड. सतिश पिंगळे, ॲड. सुहासिनी लांडगे, ॲड. मुकुंद आगलावे,
ॲड. रणजीत पाटील, ॲड. सुनिल धिवार, आदी वकील मंडळी उपस्थित होती.कोविड प्रतिबंधक सर्व नियम पाळून कार्यक्रमाचे नियोजन व अल्पोपहार व्यवस्था कार्यालयीन अधिक्षक सुनिता तिकोणे व अधिक्षक राजेश गायकवाड व त्यांचे सहकाऱ्यांनी चोख ठेवली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App