विशेष प्रतिनिधी
मुंबई – वाढती महागाई आणि चलनवाढ लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या द्वैमासिक पतधोरणात रेपो रेट चार टक्क्यांवर तसेच रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर ९.५ टक्के; तर चलनवाढीचा दर ५.७ टक्के राहण्याचा अंदाजही रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.Repo and reverse repo rates will remains same
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट थंडावत असताना देशातील आर्थिक व्यवहार सुरू झाले असून अर्थव्यवस्था सावरू लागली आहे.
वर्ष २०२१-२२ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढ ९.५ टक्के राहील, हा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २१.४ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ७.३ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ६.३ टक्के व चौथ्या तिमाहीत ६.१ टक्के अशी जीडीपीमध्ये वाढ होण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे;
तर पुढील आर्थिक वर्षाच्या (२०२२-२३) पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून २०२२) हा दर १७.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. ग्राहकांच्या क्रयशक्तीवर आधारित चलनफुगवट्याचा दर या आर्थिक वर्षात ५.७ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App