प्रतिनिधी
पुणे : Rahul Deshpande प्रसिद्ध मराठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी नेहा यांनी 17 वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला पूर्णविराम देत घटस्फोट घेतला आहे. राहुल देशपांडेंनी स्वतः सोशली मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. राहुल आणि नेहा यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून, त्यांचा कायदेशीर घटस्फोट सप्टेंबर 2024 मध्येच झाला होता. मात्र जवळपास वर्षभर हा विषय खासगी ठेवून, राहुल देशपांडेंनी नुकताच तो सर्वांशी शेअर केला. या बातमीमुळे राहुल देशपांडे यांच्या चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. चाहत्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देत राहुल आणि नेहा यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.Rahul Deshpande
नेहा देशपांडे या देखील गायिका असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्या संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. विभक्त झाल्यानंतरही राहुल आपल्या मुलगी रेणुकासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत राहतात. विशेष म्हणजे, त्या पोस्ट्समध्ये ते नेहा देशपांडेंनाही टॅग करतात.Rahul Deshpande
राहुल देशपांडेंची सोशल मीडिया पोस्ट काय?
प्रिय मित्रांनो, तुमच्यापैकी प्रत्येकाने माझ्या प्रवासात आपापल्या परीने एक महत्त्वाचा भाग निभावला आहे आणि म्हणूनच मला तुमच्यासोबत एक वैयक्तिक आणि महत्त्वाचे अपडेट शेअर करायचे आहे. तुमच्यापैकी काही जणांना मी ही बातमी आधीच सांगितली आहे. 17 वर्षांच्या संसारानंतर आणि कितीतरी अविस्मरणीय आठवणींनंतर मी आणि नेहाने परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे कायदेशीर विलगीकरण सप्टेंबर 2024 मध्ये सौहार्दपूर्णरित्या पूर्ण झाले.Rahul Deshpande
मी हे अपडेट शेअर करण्यापूर्वी काही वेळ घेतला. जेणेकरून या बदलाच्या प्रक्रियेला मी खाजगीरित्या हाताळू शकेन आणि सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. विशेषतः आमची मुलगी रेणुका हिच्या हिताची. ती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि मी नेहा सोबत तिच्यासाठी अतुट प्रेम, साथ आणि स्थैर्य देण्यास कटिबद्ध आहे. हा जरी आमच्या वैयक्तिक आयुष्यातील एक नवीन अध्याय असला, तरी पालक म्हणून आमचे नाते आणि एकमेकांबद्दलचा आदर आजही तितकाच घट्ट आहे. या काळात तुम्ही माझ्या गोपनीयतेचा आणि निर्णयाचा आदर कराल अशी आशा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App