भारतीय टपाल विभागाने तयार केलेल्या शहाजीराजे भोसले यांच्या विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन

शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी रोज उद्घोषणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासनाकडून दर महिन्याला एक विशेष टपाल तिकीट किंवा विशेष आवरणाचे प्रकाशन करण्यात येते. भारतीय टपाल विभागाने तयार केलेल्या शहाजीराजे भोसले यांच्या विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. Release of a special cover of Shahajiraj Bhosle created by the Indian Postal Department

दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरीतिरंगा हे अभियान राबविण्यात येणार असून यावर्षीच्या अभियानाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आली.  याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता २ ते ३ मिनिटांची उद्घोषणा प्रसारित करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवातही आजपासून करण्यात आली. पुढील वर्षभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहितीही मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Release of a special cover of Shahajiraje Bhosle created by the Indian Postal Department

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात