विशेष प्रतिनिधी
मुंबई : मध्य रेल्वे मुंबई मध्ये लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे. फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट या पदांसाठी ही भरती आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीची तारीख ३० मार्च आहे. Recruitment of Radiologist, Physician in Central Railway Mumbai
रेडिओलॉजिस्ट (Radiologist) फिजिशियन (Physician) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून MD / DNB पर्यंत शिक्षण असणे आवश्यक आहे. संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.
बायोडेटा, दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत. मुलाखतीचा पत्ता : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई-४०००२७
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App