विशेष प्रतिनिधी
मुंबई : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मार्केटिंग डिव्हिजनने देशभरातून ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अपरेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवारांसाठी एकूण ११९६ पदांची भरती करण्यात येणार आहे. ही रिक्त पदे IOCL च्या उत्तर विभाग आणि पश्चिम विभागामध्ये भरली जात आहेत. अधिकृत वेबसाइट iocl.com वर जाऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. Recruitment of 1196 posts of Indian Oil Corporation
IOCL मध्ये, उत्तर विभागात ६२६ आणि पश्चिम विभागात ५७० पदे रिक्त आहेत. उत्तर विभागांतर्गत चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश येथे एकूण ६२६ पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ३१ जानेवारी पर्यंत वेळ आहे.
त्याचबरोबर पश्चिम विभागांतर्गत गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, दादरा आणि नगर हवेलीमध्ये एकूण ५७० पदे भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे.
उमेदवार भरती पासून संलग्न सूचना पूर्णपणे वाचून ऑनलाइन अर्ज करावे. अर्ज सबमिट करण्यापूर्वी ते नीट तपासावे.परीक्षेची तारीख आणि इतरतपशील जाणून घ्यावा आणि परीक्षेसाठी सराव सुरू करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App