विशेष प्रतिनिधी
पुणे : महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता देण्यात आली आहे.डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या 15 एकर जागेत महाविद्यालयाचे बांधकाम करण्याचा मार्ग खुला झाला आहे. Recognition of Pune Municipal Medical College Atal Bihari Vajpayee Hospital in place of Dr Naidu Hospital
कोरोनाची साथ अटोक्यात आल्यानंतर नायडू रुग्णालय बाणेर येथील कोविड सेंटरच्या जागेत हलवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती. रुग्णालयाच्या जागेवर महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम होणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी हा अंतिम प्रस्ताव शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आला होता. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून अंतिम मान्यता मिळाल्या. त्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षापासून कमला नेहरु रुग्णालयातून महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App