एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर संतप्त शिवसैनिकांना संबोधताना संजय राऊत यांनी जी शिवराळ भाषा वापरली आहे, तिचा उल्लेख एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी थेट सुप्रीम कोर्टात केला आहे!! Read and listen to Sanjay Raut’s Shivral language
संजय राऊत अतिशय शिवराळ भाषेत धमक्या देतात. त्यामुळे महाराष्ट्रात मुंबई हायकोर्टात न्याय्य पद्धतीने सुनावणी होण्यासारखी परिस्थिती नाही, असा दावा एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला आहे. गुवाहाटीत गेलेल्या 40 आमदारांची प्रेतेच परत येतील. त्यांना पोस्टमार्टेमसाठी आम्ही विधानसभेत पाठवून देऊ, असे संजय राऊत म्हणाले होते. याचा उल्लेख या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला आहे.
मुंबईतल्या शिवसैनिकांच्या विविध मेळाव्यांमध्ये संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार तोफा डागल्या होत्या. पण त्यावेळी त्यांची भाषा अतिशय शिवराळ होती. गुवाहाटीत कामाख्या देवीचे मंदिर आहे. तिला रेडे बळी देण्याची प्रथा आहे. इकडनं 40 रेडे तिकडे पाठवले आहेत. त्यांना बळी द्या. ते पुन्हा इकडे आले की त्यांची प्रत्येक पोस्टमार्टेमसाठी आम्ही पाठवून देऊ, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. याचा उल्लेख एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला आहे.
नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा हवाला
त्यानंतर संजय राऊत यांनी दुसऱ्या मेळाव्यात विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा हवाला देऊन शिवसेनेच्या 40 आमदारांना डुक्कर म्हणले होते. मी आसाममधल्या गुवाहाटीला अनेकदा गेलो आहे. गुवाहाटीच्या रस्त्यावर डुकरे फार आहेत. आपली इकडची 40 डुकरे तिकडे गेली आहेत. त्या डुकरांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आहे. ती तिथे मजा करत आहेत. पण लक्षात ठेवा डुकरांना पण कापत असतात, असा उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे.
या शिवराळ आणि आक्षेपार्ह भाषेबद्दल शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात तीव्र आक्षेप नोंदवत महाराष्ट्रात आता न्याय्य पद्धतीने हायकोर्टात सुनावणी घेण्याची परिस्थिती उरलेली नाही असा दावा केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App