प्रतिनिधी
मुंबई : पाकिस्तानात राहून भारतात विविध राज्यांत दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा कट रचणारा खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह उर्फ रिंदा याच्या चार साथीदारांना गुप्तचर यंत्रणांनी हरियाणात अटक केली. या दहशतवाद्यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये अमृतसर येथील तरणतार रोड येथे आणि मार्च २०२२ मध्ये महाराष्ट्रातील नांदेडमध्ये आरडीएक्स पोहचवल्याची माहिती दिली आहे. नांदेडमध्ये पोहचवलेल्या आरडीएक्सच्या माध्यमातून मुंबईत पुन्हा एकदा रेल्वेमध्ये सीरिअल बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट होता. त्यासाठी स्लीपर सेलच्या माध्यमातून मुंबईत आरडीएक्स पाठवण्याचे प्लॅनिंग सुरु होते, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. RDX of Khalistani terrorists reached Maharashtra
विशेष म्हणजे आरडीएक्स नांदेडमध्ये पोहचले तरी याची माहिती महाराष्ट्र एटीएसला नव्हती, त्यामुळे महाराष्ट्र एटीएसच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता ते आरडीएक्स कुठे गेले??, याचा तपास महाराष्ट्र एटीएस करू लागली आहे.
गुप्तचर यंत्रणांनी अटक केल्यावर एटीएस सक्रीय
नांदेडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील आरडीएक्स आणले जात आहे, अशी माहिती जेव्हा गुप्तचर यंत्रणांना मिळाली, तेव्हा गुप्तचर यंत्रणा सक्रीय झाल्या आणि त्यांनी खलिस्तानीच्या 4 दहशतवाद्यांना अटक केली. महाराष्ट्रात इतका मोठा कट शिजत असतानाही याविषयी महाराष्ट्र एटीएसला काहीच माहिती नव्हती.
जेव्हा 4 दहशतवाद्यांना हरियाणात पकडण्यात आले, तेव्हा हा कट उघडकीस आला. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस सक्रिय झाले आहे आणि त्यांनी नांदेडमध्ये जाऊन कोम्बिग ऑपरेशन सुरु केले आहे. जे आरडीएक्स हे दहशतवादी णणार होते, ते कशासाठी वापरले जाणार होते, याचा तपास महाराष्ट्र पोलीस करत आहेत. त्यासाठी महाराष्ट्र एटीएसचे पथक हरियाणात जाणार आहे. तिथे जाऊन ते अटकेत असलेल्या 4 दहशतवाद्यांची चौकशी करणार आहेत. हे चारही दहशतवादी ‘सिग्नल’ या ऍप द्वारे एकमेकांच्या संपर्कात होते, जेणेकरून कोणतीही यंत्रणा त्यांना पकडू शकणार नव्हती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App