दु:खीत अंत:करणाने रवींद्र धंगेकरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; पक्षांतराच्या वर्तुळात शिंदेसेनेच्या सत्तेपुढे शरणागती!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : अखेरीस रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, पण ती अत्यंत दुःखीत अंत:करणाने. त्यानंतर त्यांनी पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण करताना शिंदेसेनेच्या सत्तेपुढे शरणागती पत्करली.

कसबा कसबा पेठेतल्या पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानंतर रवींद्र धंगेकर पुण्यातल्या काँग्रेसचे “हिरो” बनले होते कारण काँग्रेसला धंगेकरांनी विजय मिळवून देईपर्यंत राजकीय दुष्काळाचा सामना करावा लागला होता. पण प्रवीण रवींद्र धंगेकर यांनी तो दुष्काळ संपवला होता. रवींद्र धंगेकर पुण्यातल्या काँग्रेसचे जवळपास “बॉस” बनले होते. त्यानंतर त्यांनी 2024 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक देखील लढवली होती परंतु ते मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर हरले आणि तिथेच त्यांच्या अंतःकरणात दुःखाची लाट उसळली होती. धंगेकर काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. ती अस्वस्थता जाहीरपणे आणि अप्रत्यक्षपणे ते बोलून दाखवत होते. पण त्यांचा निर्णय होत नव्हता.



अखेरीस एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्याशी वेगवेगळ्या टप्प्यांवर चर्चा करून धंगेकर यांनी काँग्रेस सोडायचा निर्णय घेतला. आपल्याला काम तर करायचे आहे, पण सत्तेशिवाय काम होत नाही. हे सत्य त्यांनी उघडपणे सांगून शिंदे सेनेच्या सत्तेपुढे शरणागती पत्करल्याची कबुली दिली. पण त्याचवेळी काँग्रेस सोडत असल्याचे दुःख त्यांनी बोलून दाखवले. काँग्रेसमध्ये १०-१५ वर्षे काम केल्यामुळे तिथे नवीन नाती तयार झाली. ती सोडून जाताना दुःख होत असल्याचे ते म्हणाले.

तसेही धंगेकर मूळ काँग्रेसवाले नव्हतेच. त्यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात राज ठाकरे यांच्या मनसेतून केली. मनसेचे पुणे महापालिकेत 29 नगरसेवक निवडून आले होते, तेव्हा धंगेकरच त्या गटाचे नेते होते. पण मनसेला त्यानंतर फारशी चांगली कामगिरी करता आली नाही म्हणून धंगेकर काँग्रेसमध्ये गेले होते. तिथे अडीच वर्षांची आमदारकी त्यांना मिळाली. या आमदारकीचेरीस धंगेकरांना काँग्रेसमध्ये काही मिळू शकले नाही. म्हणूनच त्यांनी पुढच्या ५ वर्षांचा विचार करून शिंदे सेनेमध्ये प्रवेश करायची तयारी चालवली. धंगेकर यांच्या रूपाने शिंदेसेनेला पुण्यात एक चर्चेतला तगडा चेहरा येऊन मिळाला आहे.

Ravindra Dhangekar resigns from Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात