विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ravindra Chavan कल्याण-डोंबिवली हा अतिशय संवेदनशील भाग आहे त्या भागातील शिवसेनेकडून काही जणांना प्रवेश देण्यात आले. त्यामुळे भाजपकडून त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रवेश देण्यात आला. मित्र पक्षातील प्रवेशाबद्दल काही आक्षेप दोन्ही बाजूने दिसत आहे. प्रवेशांबाबत वरिष्ठ मंडळी चर्चा करतील यावर पडदा पडला पाहिजे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.Ravindra Chavan
रवींद्र चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील महायुतीमधील मित्र पक्षामधील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे घेऊ नये असे ठरले आहे. त्यामुळे लवकरच सर्वच गोष्टीची चर्चा होईल. निवडणुकीला निवडणुकीसारखे घेतले पाहिजे त्यानंतर सर्व काही विसरले पाहिजे म्हणत मित्र पक्षा फोडल्याच्या आणि मित्र पक्षांच्या नेत्यांवर टीका केल्याच्या मुद्द्यावर बोलताना रवींद्र चव्हाणांनी म्हटले आहे.Ravindra Chavan
सरकारच्या काळात अनेक कामे
महायुती सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या कार्यकाळात जवळपास 37 हजार कामे पूर्ण झाली आहेत. राज्य सरकारकडून गतीमान विकास सुरू आहे. नदीजोड प्रकल्पांची चर्चा गेली अनेक वर्षे सुरू होती पण त्यासाठी खरे प्रयत्न सुरू हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
रवींद्र चव्हाण म्हणाले की, विरोधक अनेक वेळा सांगत होते की लाडकी बहीण योजना बंद होईल पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी सांगतात की मी मुख्यमंत्री असेपर्यंत या योजनेला कुठेही धक्का लागणार नाही कारण मी तुमचा लाडका देवाभाऊ आहे. राज्यातील 10 जिल्ह्यामध्ये उमेदच्या माध्यमातून मॉल तयार व्हावे आणि महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहे.
सर्वाधिक FDI महाराष्ट्रात
रवींद्र चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राला जर पुढे न्यायचे असेल तर राज्यात गुंतवणूक येणं गरजेचे आहे. डावोसमध्ये जवळपास 16 लाख कोटी पेक्षा जास्त सामजस्य करार झाले आहे. यापैकी 80 टक्क्यापेक्षा जास्त उद्योगांना सुरवात झाली आहे. देशभरातील सर्वात जास्त FDI आपल्या महाराष्ट्रात झाली आहे. यामुळे दीड लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. तर दुसरीकडे 45 हजार पोलिस भरती करण्यात आली आहे. तर विविध विभागात भरती प्रक्रिया राबवत नोकरीची संधी मिळत आहे.
नवी मुंबईत 5 विदेशी विद्यापीठ
रवींद्र चव्हाण म्हणाले की, नवी मुंबईमध्ये 5 परदेशी विद्यापीठाचे करार झाले आहेत नवी मुंबई हे शहर शैक्षणिक शहर म्हणून पुढे येईल.शिक्षणाच्या निमित्ताने जे विद्यार्थी बाहेर जात असतात त्यांना बाहेर न जाता इथेच ते शिक्षण मिळावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हे विद्यापीठ इथे यावे यासाठी प्रयत्न केले. दुरदृष्टी असलेला नेता कसा असतो हे त्यामुळे दिसून आल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.
शिवरायांचा इतिहास शिकवण्याचा प्रयत्न
रवींद्र चव्हाण म्हणाले की, शालेय शिक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो इतिहास आहे तो इतिहास त्यामध्ये प्रामुख्याने शिकवला गेला पाहिजे.यासाठी गेल्या वर्षभरात पाऊल सरकारने उचलले आहे. मोठ्या शहरात क्रीडा संकूले तयार करण्यासाठी प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App