‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी होताच रविकांत तुपकरांची घोषणा; महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीद्वारे 25 जागांवर विधानसभा लढणार

Ravikant Tupkar's announcement after being kicked out of 'Swabhimani

विशेष प्रतिनिधी

बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अनेक वर्षे काम करणारे नेते रविकांत तुपकर( Ravikant Tupkar) यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. पक्षांतर्गत मतभेदांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पुण्यात बैठक घेत नवीन संघटनेची स्थापन करण्याचा निर्धार केला आहे. तर विधानसभा निवडणुकीत आपण उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. Ravikant Tupkar’s announcement after being kicked out of ‘Swabhimani

25 जागांवर निवडणूक लढणार

रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर रविकांत तुपकर यांनी नव्या संघटनेची घोषणा केली आहे. रविकांत तुपकर यांनी पुण्यात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत 25 जागांवर निवडणूक लढवण्याचे ठरले. या बैठकीनंतर रविकांत तुपकर यांनी आपला पक्ष हा येत्या निवडणुकीत 25 जागांवर निवडणूक लढवणार, अशी घोषणा केली.

तुपकर यांच्याकडून मोठी घोषणा

रविकांत तुपकर यांनी आपल्या पक्षाचं नाव महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी असे ठेवले आहे. त्यांनी आपल्या पक्षाच्या नावाची देखील घोषणा केली आहे. रविकांत तुपकर यांनी संघटना बुलढाणा जिल्ह्यात विधानसभेच्या 6 जागा लढवणार आहे. विशेष म्हणजे लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. राज्यातील तिसरी आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार असे रविकांत तुपकर म्हणाले.

तिसरा समर्थ आघाडीचा पर्याय देणार

शेतकरी चळवळीचे काम यापुढील काळात ताकदीने आम्ही पुढे नेणार असन तरुणांना राज्यातील एकत्रित करुन छोटेमोठे फाऊंडेशन, शेतकऱ्यांचे पक्ष एकत्रित घेऊन राज्याला तिसरा समर्थ पर्याय देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी आम्ही आज स्थापन करत आहोत. राज्यात 25 जागा आगामी विधानसभा निवडणुकीत लढणार बसून बुलढाण्यात 6 जागा लढणार आहे. राज्यभराचा मी दौरा करणार असून शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलन आम्ही लवकरच उभे करणार आहे. बिगरराजकीय शेतकरी संघटना उभी करण्यासाठी कोअर कमिटी आम्ही स्थापन करत असून ती आठवडाभरात त्याबाबत निर्णय घेईल असे मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले.

Ravikant Tupkar’s announcement after being kicked out of ‘Swabhimani

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात