खासदार नवनीत राणा ठाकरे सरकारविरुद्ध आक्रमकपणे बरसत असल्याने आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध सूडबुद्धीने कलम 307 प्रमाणे म्हणजे हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नंतर ठाकरे सरकारने सूडबुद्धीने पुन्हा कारवाई केल्याचा आरोप होत आहे.Ravi Rana punished for aggression against Thakerey goverment by wife MP Navneet Rana
विशेष प्रतिनिधी
अमरावती – खासदार नवनीत राणा ठाकरे सरकारविरुद्ध आक्रमकपणे बरसत असल्याने आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध सूडबुद्धीने कलम 307 प्रमाणे म्हणजे हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नंतर ठाकरे सरकारने सूडबुद्धीने पुन्हा कारवाई केल्याचा आरोप होत आहे.
अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर काल झालेल्या शाईफेक प्रकरणात आमदार रवी राणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी राणा आणि इतर 11 जणांवर कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या प्रकरणात पोलीसांनी आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. राजापेठ उड्डाणपुलावरील अनधिकृत पुतळा हटवल्याने आयुक्तांवर बुधवारी शाईफेक करण्यात आली होती. या प्रकरणात युवा स्वाभिमान पक्षाच्या 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मला विचारून लफडं केलं का? तक्रार घेऊन आलेल्या महिलेला खासदार नवनीत राणा यांनी केला उलट सवाल
राजापेठ उड्डाण पुलावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात मनपा आयुक्त आष्टीकर हे त्यांच्या अंगरक्षक पोलीस कर्मचारी आणि मनपा अधिकार्यांसह उड्डाणपुलाखाली आले होते. तेवढ्यातच दोन महिला आणि काही शिवप्रेमी आले. मनपा आयुक्त आष्टीकर यांना पकडून त्यांच्या अंगावर काळी शाई फेकली. या झटापटीतून आष्टीकर यांनी पळण्याचा प्रयत्न ही केला. मात्र पुन्हा त्यांचा पाठलाग करून त्यांची कॉलर पकडून दोन महिलांनी शाई फेकून त्यांच्या विरोधात घोषणा देऊन तेथून पळ काढला.
गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आमदार रवी राणा म्हणाले, महानगरपालिका, पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन त्या ठिकाणी पुतळा बसवू दिला नाही. गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाइफेक केली आणि ज्या शिवप्रेमींनी केली आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशी प्रतिक्रिया राणा दांपत्याने दिली.
रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा ठाकरे सरकारविरुद्ध आक्रमक झाल्या आहेत. लोकसभेतही त्यांनी महविकास आघाडीचे वाभाडे काढले होते. त्यामुळेच रवी राणा यांना अडकविण्यााठी कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App