Ravi Rana : बच्चू कडू हे पैशांसाठीच गुवाहाटीला गेले होते, नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचा आरोप

Ravi Rana

विशेष प्रतिनिधी

अमरावती :Ravi Rana  प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू हे शिवसेनेतील बंडावेळी केवळ पैशांसाठीच गुवाहाटीला गेले होते, असा दावा माजी खासदार नवनीत राणा यांचे पती तथा आमदार रवी राणा यांनी केला आहे. बच्चू कडूंनी आतापर्यंत जी आंदोलने केली, ती केवळ पैशांसाठीच केली. विधानसभेला उमेदवार उभे करून पैसे उकळणे हेच त्यांचे काम आहे. हा एक नंबर चिल्लर माणूस असून, त्या चिल्लर माणसाने जास्त वाजू नये, असे त्यांनी म्हटले आहे. रवी राणा यांच्या या टीकेमुळे अमरावतीचे राजकारण चांगलेच तापले आहे.Ravi Rana

बच्चू कडू यांनी बुधवारी सकाळी राणा दाम्पत्यावर टीका केली होती. राणा दाम्पत्यासारखे नाटकी दाम्पत्य अवघ्या देशात सापडणार नाही, असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले, बच्चू कडू यांची नौटंकी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांची आदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही. त्यांचे कर्तृत्व तरी काय आहे? त्यांनी 100 जणांना तरी रोजगार दिला का? याऊलट शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना माझ्या किडनीला इजा झाली. शेतकऱ्याच्या मुलाने बच्चू कडू यांचा निवडणुकीत तब्बल 12 हजार मतांनी पराभव केला. आता ते शेतकऱ्यांचे नाव घेऊन नौटंकी करत आहेत.Ravi Rana



बच्चू कडूंना इंजेक्शन देण्याची गरज

रवी राणा यांनी यावेळी बच्चू कडू हे केवळ पैशांसाठीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेल्याचाही दावा केला. ते म्हणाले, बच्चू कडू यांच्यासाठी ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपय्या आहे. बच्चू कडू हे केवळ मलिदा खाण्यासाठी मंत्री झाले. चिल्लर माणसाने अशा प्रकारच्या धमक्या देऊ नये. त्यांची मतदारसंघात कोणतीही इज्जत नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अनेकदा आमच्याशी डील करण्याचा प्रयत्न केला. पण डील तुटल्यामुळे त्यांनी उमेदवार दिला. ते एखाद्या कुत्र्यासारखे महाराष्ट्रभर भुंकत असतात. त्यांना इंजेक्शन देण्याची गरज आहे.

चिल्लर जास्त वाजली की त्याचे परिणाम भोगावे लागतात

एखादे कुत्रे कावरते तेव्हा त्याला उपचारांची गरज असते. बच्चू कडूंवरही उपचार करण्याची गरज आहे. त्यांना योग्य उपचार मिळाले की, ते आपोआप सरेंडर होऊन जाईल. त्यांनी आतापर्यंत जी आंदोलने केली, ती केवळ पैशांसाठीच केली. विधानसभेला उमेदवार उभे करून पैसे उकळणे हे त्यांचे काम आहे. तुम्हाला कुणीही जबाबदारी दिली नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ कराल, आमदारांना कापून टाकण्याची भाषा कराल हे चालणार नाही. बच्चू कडू एक नंबरचा चिल्लर माणूस आहे. चिल्लर माणसाने फार वाजू नये. अन्यथा चिल्लर जास्त वाजली की त्याचे परिणाम भोगावे लागतात, असा इशाराही रवी राणा यांनी यावेळी त्यांना दिला.

बच्चू कडू डोनाल्ड ट्रम्पच्याही पक्षात जातील

रवी राणा यांनी यावेळी आपल्या पत्नी नवनीत राणा यांनी भाजपत जाण्याचा हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, मी स्वाभिमान पक्षात आहे. नवनीत राणा भाजपमध्ये आहेत. भाजपत जाण्याचा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे. देशातील अनेक मोठ्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे त्या भाजपमध्ये गेल्या. त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे. बच्चू कडूही पूर्वी काँग्रेससोबत होते. नंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिले. आता ते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. भविष्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा एखादा पक्ष आला तर ते त्यांच्यासोबतही जातील.

संजय राऊतांवरही साधला निशाणा

रवी राणा यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, राज्य सरकारने कितीही चांगले काम केले तरी संजय राऊत मातोश्रीला खुश करण्यासाठी टीका करतात. त्यांची चापलुसी करतात. त्यांचा भोंगा सकाळी वाजतो. त्यांना निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मदत केली. फक्त एका मताने ते निवडून आले. मी स्वतः राऊतांना मतदान केले. त्यामुळे ज्या आमदारांनी त्यांना मतदान केले, त्यांना ब्लॅकमेलर म्हणणे योग्य नाही, असे रवी राणा म्हणाले.

Ravi Rana Alleges Bachchu Kadu Went Guwahati For Money Calls Him Chillar Man Jibe

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात