प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता रवी किशन यांच्या लेकीची वेगळी वाट

सैन्यात भरती होत बनली महिला अग्नीवीर! रवी किशन यांच्या लेकीवर कौतुकाचा वर्षाव!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : कुठल्याही क्षेत्रात सध्या घराणे शाही हा मुद्दा ऐरणीवर आहे. आपल्या क्षेत्रात आपल्या मुलांना लॉन्च करा व यासाठी पालक थोडे आग्रही दिसतात. त्यात विशेष करून राजकारण, आणि सिनेमा मनोरंजन विश्व आघाडीवर आहे. Ravi kishan’s daughter join Defence Force.

सेलिब्रिटींच्या मुलांवर तर कायम नेपोटिझमचा आरोप होतो. मात्र या सगळ्याला फाटा देत . भोजपुरी अभिनेता आणि बीजेपी चे खासदार रवी किशन यांच्या लेकीन वेगळी वाट निवडली. मनोरंजन विश्वाकडे न वळता इशिताने शुक्लानं भारतीय सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतलाय . इशिता च्या या बातमीला सोशल मीडियात चांगलीच पसंती मिळाली . आणि इशितावर विशेष अभिनंदनचा आणि कौतुकाचा वर्षावं केला आहे.



इशिता ही आता २१ वर्षांची आहे. इशिताचं कौतूक करताना एका युझर्सनं लिहिलं आहे की, आम्हाला तुमचा खूप गर्व वाटतो. तुम्ही एक आदर्श उदाहरण बाकींच्यासमोर ठेवले आहे. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते.पिता या नात्याने रवि किशन यांच्यावर देखील नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. यांच्या विशेष संस्कारांचाही कौतुक चाहत्यांनी केलं आहे.आणि
त्यांना भरभरून शुभेच्छाही दिल्या आहेत.

इशितानं २६ जानेवारीच्या परेडमध्ये भाग घेतला होता. एनसीसीमधून २६ जानेवारीच्या परेडमध्ये भाग घेणारी १४८ मुलींमधून ती एकमेव होती. रवि किशन यांनी देखील सोशल मीडियावर ट्विट करुन यासंबंधी एक माहिती दिली होती. मला तुझा गर्व वाटतो असं म्हणत त्यांनी ट्विट केलं होतं. रवी किशन यांना तीन अपत्य आहेत. रवी किशन हे मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेता आहेत. आणि आता त्यांच्या मुलीने उचललेल्या पाऊलामुळे त्यांच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तोरा खोवला गेला आहे.

Ravi kishan’s daughter join Defence Force.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात