Raosaheb Danve : रावसाहेब दानवे म्हणाले- नागपूर घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यामुळे हिंसाचार घडला

Raosaheb Danve

प्रतिनिधी

मुंबई : Raosaheb Danve औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण तापले असून मंगळवारी रात्री नागपूर शहरात हिंसाचार उसळला होता. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत केलेल्या विधानामुळे नागपूरमधील घटना घडली, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. रावसाहेब दानवेंच्या या विधानामुळे आता पुन्हा वेगळाच राजकीय वाद उद्भवण्याची शक्यता आहे.Raosaheb Danve

नागपूरमधील हिंसाचारावरून महाविकास आघाडीतील पक्षांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या विधानामुळे नागपूरमधील घटना घडली असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर भाजपकडूनही विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. अशात नागपूरमधील घटनेला काँग्रेसच जबाबदार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.



रावसाहेब दानवे म्हणाले की, नागपूरमध्ये मंगळवारी रात्री घडलेल्या काँग्रेसच जबाबदार आहे. कारण, काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीची तुलना थेट औरंगजेबासोबत केली होती. हर्षवर्धन सपकाळ यांचे हे वक्तव्य चुकीचे असून त्यांच्या या वक्तव्यामुळेच नागपूरची घटना घडल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला. नागपूरच्या घटनेचा मी निषेध करतो, मात्र महाराष्ट्रात अशा घटना घडल्या नाही पाहिजे, असेही दानवे म्हणालेत.

कुणाचीही औरंगजेबाशी तुलना योग्य नाही

दरम्यान, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या मतांशी फारकत घेताना दिसले. मी हर्षवर्धन सपकाळ हे काय बोलले ऐकले नाही. मात्र देवेंद्र फडणवीस असो कि आणखी कोणी असो, कोणाची अशी औरंगजेबाशी तुलना करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

हर्षवर्धन सपकाळांचे विधानावर स्पष्टीकरण

दरम्यान, माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी आज बोलताना मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना शब्दांचा तोल कुठेही गेलेला नाही. फडणवीस हेच औरंगजेब आहेत असे मी बोललेलो नाही. त्यांनी तशीच वेशभूषा करावी आणि ते तसेच आहेत असे मी म्हटलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर मी व्यक्तिगत टीका केलेली नाही. राज्य कारभारावर टीका केलेली आहे आणि ती टीका करणे हा आमचा अधिकार आहे, असे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले.

Raosaheb Danve said – Congress is responsible for the Nagpur incident; Harshvardhan Sapkal’s statement led to violence

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात