नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर अकोट विकास मंच सावरायला आले रणधीर सावरकर!!, असेच राजकीय चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या गंभीर इशाऱ्यानंतर समोर आले.Randhir Savarkar came to the rescue of Akot Vikas Manch after the Chief Minister’s blow!!
अकोट मध्ये भाजपने असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाशी युती केली. त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये काँग्रेसशी युती केली. भाजपने या दोन्ही युती केवळ सत्तेसाठी केल्या, अशी वातावरण निर्मिती महाराष्ट्रात झाली. भाजपवर सगळीकडून टीकेची झोड उठली. त्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे आले आणि असली कुठलीही युती आम्ही सहन करणार नाही. भाजपच्या ज्या स्थानिक नेत्यांनी तशी युती केली असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असा इशारा दिला.
– रणधीर सावरकरांचा दावा
त्याबरोबर अकोट आणि अकोला जिल्ह्यातील राजकीय सूत्रे हलली. आमदार प्रकाश भारसाकळे आणि भाजपचे आमदार आणि विधानसभेतले मुख्य प्रतोद रणधीर सावरकर राजकीय दृष्ट्या अडचणीत आले. एकीकडे अकोटची सत्ता टिकवायची आणि दुसरीकडे भाजपचे तात्त्विक समर्थन करायचे, अशा कात्रीत रणधीर सावरकर सापडले. म्हणूनच त्यांनी अकोटची युती सावरून धरण्यासाठी वेगवेगळे डाव खेळले. अकोट मध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाचे चार नगरसेवक आहेत ते त्यांच्या पक्षाला डावलून AIMIM पक्षाच्या जाती राजकारणाला कंटाळून अकोट विकास मंचात सामील झाले, असा दावा रणधीर सावरकर यांनी केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे नगरसेवक सुद्धा अकोटच्या विकासासाठी किमान समान कार्यक्रमावर एकत्र आले. भाजपच्या नेतृत्वाखाली त्या विकास मंचात सामील झाले, असा दावाही रणधीर सावरकर यांनी केला. बाकीच्या पक्षांचे सुद्धा नगरसेवक त्यांचे पक्ष बाजूला सारून अकोट विकास मंचात सामील झाले. त्यासाठी त्यांनी त्यांच्या पक्षाचे परवानगी घेतली, की नाही याचा विचार त्यांनी करायचा आहे, असे सांगून रणधीर सावरकर यांनी हात झटकले.
मुख्यमंत्र्यांची “री” ओढल्याशिवाय पर्याय नाही उरला
पण मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर रणधीर सावरकर यांना त्यांचीच “री” ओढण्याशिवाय पर्याय उरला नाही. भाजपच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांना डावलून स्थानिक पातळीवरल्या नेत्यांनी काँग्रेस किंवा AIMIM पक्षाशी युती केली असेल, तर त्यांच्यावर 48 तासांच्या कठोर कारवाई केली जाईल, असेही रणधीर सावरकर यांना सांगावे लागले. पण या सगळ्यातून रणधीर सावरकर यांना अकोट विकास मंच सावरणे भाग पडले असेच चित्र निर्माण झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App