रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदमांना ईडीकडून अटक; अनिल परबांच्या साई रिसॉर्ट प्रकरणी कारवाई

वृत्तसंस्था

मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना अखेर ईडीने अटक केली. दापोलीमधील कथित साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे. Madas Kadam’s brother Dananda Kadam arrested by ED

उद्योजक सदानंद कदम हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे लहान बंधू आहेत. त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. ईडीने त्यांना ताब्यात घेतले असून ईडीचे पथक त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहे. रत्नागिरीतील खेडमधील कुडोशी येथील सदानंद कदमांच्याच अनिकेत फार्म हाऊस येथून त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.

सध्या दापोलीतील साई रिसॉर्टची सध्या मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर सातत्याने आरोप केले होते. याच साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांकडून सदानंद कदमांचेही नाव जोडण्यात आले होते.

Ramdas Kadam’s brother sadananda Kadam arrested by ED

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात