वृत्तसंस्था
अकोला : अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी न होणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर आगामी निवडणुकीत मतदारांनी बहिष्कार टाकावा, अशी आमची भूमिका असल्याचे ‘आरपीआय’चे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणाले. गायरान जमीन हक्क परिषदेसाठी अकोल्यात आलेल्या श्री. आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.Ramdas Athawale’s appeal, boycott the election on Congress leaders who do not go to Pranapratistha ceremony
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मी जाणार असून, या सोहळ्याचे कोणी राजकारण करू नये, अशा शब्दात श्री. आठवले यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. महाराष्ट्रात महायुतीने लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार आहे. शिर्डी व सोलापूर या किमान दोन जागा ‘आरपीआय’ला मिळाव्यात, यासाठी भाजपचे केंद्रीय व राज्यातील नेते तसेच शिवसेना नेत्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. राज्यातही एक मंत्रीपद देण्याची मागणी आम्ही भाजपकडे केली होती. मात्र आमच्यापूर्वीच राकाँच्या अजित पवार गटाला सत्तेत सहभागी करून घेतले, असे म्हणत श्री. आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला ‘आरपीआय’चे नेते अशोक नागदिवे, जिल्हाध्यक्ष सुनील अवचार उपस्थित होते.
काँग्रेसचा केवळ मतांवर डोळा ः काँग्रेसने आजपर्यंत केवळ दलितांच्या मतांवर डोळा ठेवून राजकारण केल्याची टीका श्री. आठवले यांनी केली. संविधान आणखी मजबूत करण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करीत असून, आणीबाणीला विरोध करणारे आता नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी एकत्र आले आहे, असे म्हणत त्यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. इंदूमिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार करण्यासह काँग्रेसच्या काळात रखडलेली कामे मोदी पूर्ण करीत असल्याचेही ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App