विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ramdas Athawale मराठा मुलीशी विवाह केल्यामुळे दलित तरुण विक्रम गायकवाड यांची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली. शनिवारी (दि.22 फेब्रुवारी,) भोर तालुक्यातील उत्रोली या गावात भेट देऊन ऑनरकिलिंग चा बळी ठरलेल्या दिवंगत विक्रम गायकवाड यांच्या कुटुंबियांची आपण सांत्वनपर भेट घेणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.Ramdas Athawale
विक्रम गायकवाड हा दलित तरुण उच्चशिक्षित होता.येत्या 3 मार्च रोजी युपीएससीची मुख्य परीक्षा देणार होता.मात्र त्यापूर्वीच त्याची माणुसकीला काळिमा फासणारी निर्घूण हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोषी गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीसांवरही कारवाई व्हावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे.
भोर येथे राहात असलेल्या विक्रम गायकवाड या तरुणानं त्याच्या लगतच्या गावातील सवर्ण समाजाच्या मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता. आंतरजातीय विवाह मुलीच्या घरच्यांना मान्य नसल्यानं विवाह मोडण्याचा प्रयत्न मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता. तसंच मुलीला आणि विक्रमला जीवे ठार मारण्याच्या धमक्या देखील दिल्या होत्या. विक्रमच्या कुटुंबीयांनी हत्या होण्याची शक्यता स्थानिक पोलिसांकडं व्यक्त केली होती. परंतु, त्याकडं पोलिसांनी दुर्लक्ष केलं आणि दुसऱ्याच दिवशी हत्या करण्यात आल्यानं या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे, असा आरोप दलित संघटनांनी केला आहे.
विक्रम गायकवाडची आई म्हणाली, “या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी. माझ्या मुलाची हत्या ही आंतरजातीय विवाह केल्यानेच झाली आहे”.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App