विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ramdas Athawale मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय विचारमंथन शिबिरात मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत एकमताने हा पाठिंब्याचा ठराव मंजूर करण्यात आला.Ramdas Athawale
आपल्या आंदोलनाची तयारी करून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत आणि त्यांनी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. मनोज जरांगे यांच्या या भूमिकेमुळे ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाच, आता रामदास आठवले यांच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे.Ramdas Athawale
आठवले गटाच्या सक्षमीकरणासाठी महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय विचार मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील उपस्थित होते. ते म्हणाले, या शिबिरात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याची भूमिका आधीपासून असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांची मागणी आहे की सर्व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या. सर्व मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणे शक्य नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको, अशी आमची भूमिका आहे. तसेच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एखादी बैठक घ्यावी आणि फडणवीस यांच्यावरील टीका टाळावी, असा सल्ला देखील रामदास आठवले यांनी दिला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकार उलथवून लावेल, असा इशारा दिला होता. त्यावर अनेकांनी टीका देखील केली होती. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील सरकार उलथवून टाकायला मनोज जरांगे यांच्याकडे किती आमदारांचा पाठिंबा आहे? असा सवाल केला होता. यावर आता किती आमदारांचा जरांगे यांना पाठिंबा आहे, हे समोर आले आहे.
किती आमदारांचा मनोज जरांगेंना पाठिंबा?
चार सत्ताधारी आमदारांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित, आमदार राजू नवघरे आणि शिवसेना शिंदे गटाचे विलास भुमरे या आमदारांचा समावेश आहे. तर विरोधी पक्षातील तीन खासदार आणि दोन आमदारांचा पाठिंबा आहे. यात शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील तर शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाठिंबा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App