Ramdas Athawale : रामदास आठवलेंचे स्वबळावरचे संकेत; म्हणाले- युतीत जागेसाठी भीक मागावी लागते, शिवसेना-NCP चा पर्याय खुला

Ramdas Athawale

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ramdas Athawale राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रंग चांगलाच चढलेला असताना, महायुतीतीलच मित्र पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. नुकतंच केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) प्रमुख रामदास आठवले यांनी केलेल्या विधानानंतर महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीत आरपीआयला जागा मिळवण्यासाठी अक्षरशः भीक मागावी लागते, अशी खंत व्यक्त केली.Ramdas Athawale

इतर पक्ष निवडणुका आल्या की सर्व जागा लढण्याचा निर्धार करतात. पण आमच्या पक्षाची परिस्थिती वेगळी आहे. आम्हाला जागांसाठी विनंती, विनवण्या कराव्या लागतात. आम्हीही या देशाच्या राजकारणात आहोत, आम्हालाही लढायचंय, पण आमच्या पक्षाला मिळणाऱ्या जागांची अवस्था दयनीय आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या भाषणाने एकच खळबळ उडाली असून आरपीआय आता स्वबळावर उतरणार का? असा प्रश्न सामन्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे.Ramdas Athawale



युती टिकवण्याचा प्रयत्न करत असतानाही त्यांनी विरोधी पथकांसारख्या विधानांचा सूर लावला. पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत युती व्हावी असा त्यांचा स्पष्ट प्रयत्न आहे. त्यांनी युतीसाठी 8 ते 9 जागांचा दावा केल्याचेही यावेळी नमूद केले. मात्र, जर भाजपने त्यांची मागणी मान्य केली नाही तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबतही हात मिळवण्यास ते मागे-पुढे पाहणार नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीच्या अंतर्गत समीकरणांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते उघडपणे पर्याय शोधू लागले आहेत, हेच त्यांच्या विधानातून समोर आले.

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रचाराची मुदत आता केवळ काही तासांवर आली आहे. संपूर्ण राज्यात 280 ठिकाणी निवडणुका होत आहेत. त्यापैकी 256 ठिकाणी महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपचे कमळ चिन्हावर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, उर्वरित ठिकाणी महायुतीतील घटकच परस्परांसमोर उभे ठाकलेले दिसत आहेत. त्यामुळे जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता रामदास आठवले यांची नाराजी बाहेर आली आहे. गेल्या काही वर्षात महायुती टिकवण्यासाठी त्यांनी सातत्याने साथ दिली असतानाही त्यांच्या पक्षाला मिळणाऱ्या जागांचे गणित हितकारक नसल्याची नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली.

भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरनांचा संदेश

आरपीआयला महायुतीत नैसर्गिक स्थान असले तरी अनेक वेळा तडजोड करावी लागते, ही त्यांच्या भाषणातून दिसणारी वेदना आहे. जेव्हा मतांची गरज असते, तेव्हा आमचे महत्त्व आठवते. पण जागा देताना आम्हाला महत्त्व दिले जात नाही. ही परिस्थिति बदलायला हवी, असे आठवले म्हणाले. त्यांचा सूर केवळ निवडणुकीपुरता नव्हता, तर भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरणांना संदेश देणारा होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर निर्माण झाला आहे, पण महायुतीत मात्र दबावाचे वातावरण तयार झाले आहे. अनेक वर्षे सत्ता वापरात सहभागी असलेल्या पक्षाला अवलंबून राहणारा पक्ष, अशी प्रतिमा नकोय, हा त्यांचा स्पष्ट संदेश आहे.

Ramdas Athawale Solo Election Signal Mahagyuti RPI Pimpri Chinchwad Photos Videos Report

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात