विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) वाढत्या भेटीगाठींनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास महायुतीला फटका बसेल, असा अंदाज वर्तवला जात असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. “राज ठाकरे सोबत आल्यास उद्धव ठाकरेंना फायदा नाही, तर त्यांचे नुकसानच होईल. यामुळे मराठी मतांमध्ये फूट पडेल आणि त्याचा थेट फायदा महायुतीला होईल,” असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.Raj Thackeray
ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना आठवले यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा संदर्भ दिला. ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे महायुतीसोबत होते, पण आम्हाला त्याचा फारसा फायदा झाला नाही. याउलट, विधानसभा निवडणुकीत ते आमच्यासोबत नसतानाही महायुतीला मोठे यश मिळाले. त्यामुळे राज ठाकरे सोबत आल्याने निवडणुकीत फायदा होईलच, असे गणित मांडणे चुकीचे आहे. उलट त्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे.”Raj Thackeray
मुंबईवर महायुतीचाच झेंडा, १६ जागांची मागणी
मुंबई महापालिकेवर मिळवण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे. “यावेळी मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल, हे निश्चित आहे,” असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच जागावाटपाबाबत बोलताना, “मुंबईत आरपीआयला २५ पैकी किमान १६ जागा मिळाव्यात,” अशी मागणी त्यांनी केली. सांगली महापालिकेतही ५ ते ६ जागांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ‘एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील’, असे भाकीत केले होते. यावर बोलताना आठवले म्हणाले, “आंबेडकर यांनी हे कोणत्या आधारावर म्हटले, हे माहीत नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीत भाजप सहजासहजी मुख्यमंत्रीपद सोडेल, असे मला वाटत नाही.”
भाजप छोटे पक्ष संपवत नाही, मी पक्ष वाढवतोय
आम्ही सत्तेत नसू, पण महायुतीमध्ये आहोत. भाजप छोटे पक्ष संपवत आहे, असे बोलले जाते. मात्र मी माझा पक्ष वाढवला आहे. आणखी दोन राज्यांत मान्यता मिळाल्यास आरपीआयला ‘राष्ट्रीय पक्षा’चा दर्जा मिळेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राहुल गांधींच्या आरोपांचा घेतला समाचार
रामदास आठवले यांनी यावेळी राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांचा समाचार घेतला. मतदार यादीबाबत बोलताना आठवले म्हणाले की, “मतांची चोरी झाली नाही पाहिजे, मतदार यादी दुरुस्त केली पाहिजे, हे योग्य आहे. मात्र राहुल गांधी सतत मतचोरी झाल्याचे आरोप करतात. मग लोकसभा निवडणुकीत काय मतचोरी झाली होती का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App