दोन वर्षानंतर मालिकेला मिळाली होती प्रसारणाची परवानगी.
विशेष प्रतिनिधी
पुणे :सध्या सर्वत्र आदी पुरुष या सिनेमाची चर्चा आहे. त्या सिनेमा निमित्त होणारे वाद त्या सिनेमातील पात्रांच्या तोंडी असलेले संवाद, या सिनेमाचं सादरीकरण या सगळ्यामुळे या सिनेमावर बोचरी टीका होत आहे. पण त्याचं दरम्यान 90 च्या दशकात ज्या मालिकेने इतिहास घडवला त्या रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेचे वेळोवेळी सध्या दाखले दिल्या जाता आहेत. Ramayan serial.. also suffered for boycot
आजही अनेकांच्या मनात या मालिकेबद्दल श्रद्धेचं आणि आदराचे स्थान आहे. या मालिकेतील पात्रांना आजही लोक समोर भेटल्यास नमस्कार करतात. एवढ पावित्र्य आणि एवढ्या आदराचं स्थान लोकांनी त्या मालिकेतील पात्रांना दिलं होतं.
रामानंद सागर यांचीं रामायण ही मालिका टीव्ही वर सुरु झाल्यास रस्ते ओस पडत असतं. एवढी प्रचंड लोकप्रियता त्या मालिकेने त्याकाळी मिळवली होती. लॉकडाउनच्या काळात देखील ती मालिका पुन्हा एकदा दाखवल्या गेली. त्याही वेळी त्या मालिकेचा टीआरपी सगळ्यात जास्त आला होता.
आज 36 वर्षानंतरही या मालिकेचे दाखले आणि संदर्भ दिल्या जातात .. मात्र या मालिकेवर देखील दोन वर्षाचीं बंदी घालण्यात आली होती.1987 मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. पण ही मालिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मात्यांनी तब्बल २ वर्षं सरकारी कचेरीचे उंबरे झिजवले होते.रामायण’मधील अभिनेते सुनील लहरी यांनीही सांगितलं की ज्याप्रमाणे ‘आदिपुरुष’ला विरोध होत आहे तसाच विरोध त्याकाळी ‘रामायण’ मालिकेला झाला होता. सीतेला स्लीवलेस ब्लाऊज परिधान केल्याचं दाखवल्याने दूरदर्शन आणि तेव्हाच्या सरकारने या मालिकेवर आक्षेप घेतला असल्याचंही सुनील लहरी यांनी स्पष्ट केलं.
रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांनी त्यांच्या पुस्तकात या सगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. तब्बल दोन वर्ष सरकारी पातळीवर पाठपुरावा केल्यानंतर या मालिकेच्या प्रसारणाला परवानगी मिळाली. ही मालिका दाखवण्यासाठी दूरदर्शनचे मालक आणि सरकार या दोघांकडूनही वेळोवेळी विरोध झाला होता.यानंतर तब्बल २ वर्ष यामागे हात धुवून लागल्यावर ही मालिका प्रसारित करायची परवानगी मिळाली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App