कर्जत जामखेडात राम शिंदेंचा रोहित पवारांना झटका; पंतप्रधान – अर्थमंत्र्यांना “सल्ले” देणाऱ्यांना ग्रामपंचायतही राखता आली नाही!!

विशेष प्रतिनिधी

कर्जत :  राज्यभरातल्या 2 हजार 359 ग्रामपंचायतींची मतमोजणीतून जे धक्कादायक निकाल समोर आले त्यात कर्जत जामखेडचाही समावेश आहे. कर्जत – जामखेडमध्ये रोहित पवारांचे वर्चस्व निर्माण होता होता अवघ्या चार वर्षांत वारे पुन्हा फिरले आहेत. कर्जत – जामखेड मतदारसंघात भाजपचे वरिष्ठ नेते आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना जबरदस्त झटका दिला आहे.Ram Shinde’s attack on Rohit Pawar in Karjat Jamkhed; Those who gave “advice” to the Prime Minister – Finance Minister could not even maintain Gram Panchayat!!



एरवी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना सल्ले देणाऱ्या रोहित पवारांना आपल्या आमदारकीच्या पहिल्याच पाच वर्षांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याचे चित्र आहे.

रोहित पवार यांना धक्का

कर्जत तालुक्यामध्ये 6 ग्रामपंचायती तर जामखेड तालुक्यांतील 3 ग्रामपंचायती अशा एकूण 9 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. भाजपाचे आमदार राम शिंदे यांच्याकडे 5 जागा तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे 2 जागा आल्या आहेत. अजित पवार गटाकडे 1 जागा, तर  स्थानिक आघाडीला जागा 1 जागा मिळाली आहे.

कर्जत जामखेड या मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना धक्का बसला असून भाजपाचे विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचं वर्चस्व कायम राहिले आहे. राम शिंदे यांचा पराभव करून कर्जत जामखेड तालुक्यावर वर्चस्व निर्माण करू पाहत असलेल्या रोहित पवारांना आमदारकीच्या पहिल्या पंचवार्षिक मध्येच झटका बसला आहे.

रोहित पवार यांच्यासह खासदार डॉ. अमोल कोल्हे, डॉ. संजय कुटे, शहाजी बापू पाटील या प्रस्थापितांना त्यांच्या मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. भाजपकडे असलेली जामोद ग्रामपंचायत आता काँग्रेसच्या ताब्यात गेली. तर दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः प्रचार करूनही त्यांचा संतोष टावरे हा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे.

Ram Shinde’s attack on Rohit Pawar in Karjat Jamkhed; Those who gave “advice” to the Prime Minister – Finance Minister could not even maintain Gram Panchayat!!

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात