Raksha Khadse रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या ५ गुंडांविरोधात “पोक्सो” कायद्यांतर्गत गुन्हे दाखल; पोलिसांची कारवाई उशिरा, पण कठोरतेकडे!!

Raksha Khadse

विशेष प्रतिनिधी

जळगाव : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्या ५ गुंडांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिसांनी अखेर “पोक्सो” कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. दोनच दिवसांपूर्वी रक्षा खडसे यांची मुलगी रिशिका तिच्या मैत्रिणींबरोबर मुक्ताईनगरच्या यात्रेत फिरायला गेली होती. तिथे भोई नावाच्या गुंडाने आपल्या साथीदारांसह येऊन रिशिका आणि तिच्या मैत्रिणींची छेड काढली. त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की केली. पोलिसांनी त्या संदर्भात कारवाई करताच भोईने स्वतःची जामिनावर सुटका करून घेतली.

पण रक्षा खडसे यांनी हे प्रकरण लावून धरले त्यांनी स्वतः रिशिका आणि अन्य मुलींसोबत पोलीस ठाण्यात जाऊन छेडछाडी विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भोई याच्यासह ५ गुंडांवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, सचिन पालवी अशी या गुंडांची नावे आहेत. या गुंडांनी गेल्याच महिन्यात मुक्ताई यात्रेतल्या फराळ वाटप कार्यक्रमाच्या वेळी देखील रिशिका आणि तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यावेळी त्यांनी त्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते.

परंतु, आज रक्षा खडसे यांनी पुढाकार घेऊन या छेडखानी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचे ठरविले. त्या स्वतः पोलीस ठाण्यात या मुलींना घेऊन पोचल्या तिथे त्यांनी पोलिसांना स्वतःचे पत्र दिले त्याचबरोबर मुलींनी संबंधित गुंडांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या गुंडांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले.

Raksha Khadse’s daughter molested

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात