विशेष प्रतिनिधी
चिखली : सध्या राज्यात राजकीय टोळीयुध्द सुरू आहे. शेतकºयांसाठी मोदी असो वा पवार, दोघांची भाषा एकच असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.Raju Shetty’s criticism of Uddhav Thackeray’s brutal mockery of farmers
बुलडाणा दौऱ्यावर असताना शेट्टी म्हणाले, सध्या राज्यात राजकीय टोळीयुद्ध सुरू आहे. कोणाला शाहरूख खानचा मुलगा काय पितो यात स्वारस्य आहे, तर कोणाला समीर वानखेडेंमध्ये. यांच्या या सुंदोपसुंदीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही.
शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा तीव्र फटका बसलेला असतानाही मोदींनी केवळ गुजरातला मदत देणे पसंत केले. शरद पवारांनादेखील पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडे काही दिसत नाही. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविषयी रोष व्यक्त करताना शेट्टी म्हणाले, राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टी झाली.
शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडी व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यायला हवी होती. मात्र, दोन्ही सरकारांनी शेतकऱ्यांची घोर निराशा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला सांगितले होते की, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; परंतु त्यांनीही केंद्राप्रमाणेच शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली. केंद्राकडे अपादग्रस्त कोष असतानाही केवळ गुजरातला १ हजार कोटींची मदत दिली व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडले.
सरकारचा हा शेतकरीविरोधी मनसुबा आम्ही कदापिही प्रत्यक्षात येऊ देणार नाही. सोयाबीन परिषद व आंदोलनाच्या माध्यमातून दोन्ही सरकारांना ताळ्यावर आणू, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App