विशेष प्रतिनिधी
मुंबई : नेते राहिनात, पक्ष टिकेना, राजकारण झाले जड; हाती काही उरले नाही, तर उरले भाजपवर खापर फोडून पळ!!, अशी अवस्था महाराष्ट्रातले दोन नेते राजू शेट्टी आणि शरद पवार यांची झाली आहे. हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपल्या पक्षातील फुटीचे खापर भाजपवर फोडून मोकळे झाले आहेत.Raju shetty and sharad pawar couldn’t save their own parties, but they blamed it on BJP for splits in their parties
रविकांत तुपकर शेट्टींवर नाराज
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर माजी खासदार आणि संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यावर प्रचंड नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांनी स्वतंत्र भूमिका घेऊन आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. पण आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही. राजू शेट्टी यांच्या गोटातूनच आपल्याला भाजपची ऑफर असल्याच्या अफवा पसरवल्या जातात, असा आरोप रविकांत तुपकर यांनी केला.
या आरोपाला उत्तर देताना राजू शेट्टी यांनी भाजपचीच रविकांत तुपकर यांना ऑफर आहे आणि फूस आहे. भाजपच इतर पक्ष फोडतो, असा प्रत्यारोप केला.
राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रभर पसरली असली तरी ताकदीच्या दृष्टीने इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत छोटी आहे. भाजपच्या सहाय्याने राजू शेट्टी 2014 मध्ये खासदार झाले होते. पण 2019 मध्ये मात्र त्यांनी भाजपपासून फारकत घेतली आणि ते महाविकास आघाडीच्या गोटात शिरण्याचा प्रयत्न करू लागले होते. ज्या शरद पवारांविरोधात तोफा डागत राजू शेट्टी खासदार झाले, त्याच शरद पवारांच्या बारामतीतल्या गोविंद बागेत जाऊन राजू शेट्टींनी आमरसाचे जेवण घेतले आणि त्यांच्याकडून राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या यादीत स्वतःचा समावेश करून घेतला. पण ती यादी अद्याप राजभवनातच पडून आहे. राजू शेट्टी आमदार होऊ शकले नाहीत.
पण दरम्यानच्या काळात त्यांच्याच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असंतोष पसरला आणि रविकांत तुपकर हे राजू शेट्टी यांच्यापासून बाजूला झाले. छोटी संघटना असताना देखील राजू शेट्टी यांना ही संघटना टिकवता येत नाही, ही राजकीय वस्तुस्थिती आहे. पण आता राजू शेट्टी स्वतःच्या संघटनेवर कॉन्सन्ट्रेशन करून ती टिकवण्याऐवजी भाजपवर खापर फोडायला पुढे सरसावले आहेत.
पवारांचेही भाजपवर खापर
जे राजू शेट्टींचे तेच शरद पवारांचे. पवारांनी तर त्या पुढे जाऊन आजही डबल गेम खेळत असल्याचे सिद्ध केले आहे. एकीकडे दिल्लीत बसून त्यांनी पुण्यातल्या कार्यकर्त्यांना भाजप विरोधात लढण्याचे बळ दिले, तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी जाऊ नये म्हणून राज्यसभेत दिल्ली विधेयकावर मतदान करण्यासाठी व्हिपच काढला नाही. त्यामुळे “इंडिया” आघाडीत शरद पवारांच्या राजकीय भूमिकेच्या प्रामाणिकतेविषयी संशय तयार झाला. तो संशय त्यांनी तयार होऊ दिला, पण प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी घालवायला मात्र ते तयार झाले नाहीत.
त्याचवेळी पवार राष्ट्रवादीतील फुटीचे खापर मात्र त्यांनी भाजपवरच फोडले. अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह बहाल करण्यासाठी यंत्रणांवर मोदी – शाह दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी दिल्लीत आपल्या निवासस्थानी पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम बाळगू नये. आपण भाजपबरोबर कधीही गेलो नाही. यापुढेही जाणार नाही, असा निर्वाळा दिला.
यातूनच राजू शेट्टी आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांची अवस्था नेते राहिनात, पक्ष टिकेना, राजकारण झाले जड; हाती काही उरले नाही, तर भाजपवर खापर खोडून पळ!!, अशी झाल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App