विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Raju Shetti अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यात झालेल्या प्रचंड नुकसानीच्या मदतीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महायुती सरकारला कडक इशारा दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या, अन्यथा किमान 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे तिप्पट नुकसानभरपाई द्या. दिवाळीपूर्वी ही मदत न मिळाल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सर्व सरकारी अधिकाऱ्यांची दिवाळी नीट होऊ देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.Raju Shetti
पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केल्यानंतर राजू शेट्टी यांनी लातूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर गंभीर टीका केली. गेल्या चार दिवसांपासून लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील नुकसानीची पाहणी सुरू आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, जमिनी खरडून गेल्या आहेत, गुरेढोरे वाहून गेली आहेत. निसर्गाचे रौद्ररूप पाहून काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत, असे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती गंभीर नसल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला.Raju Shetti
फडणवीसांना स्वतःच्याच मागणीची करून दिली आठवण
शेतकऱ्यांसाठी मदतीचा मार्ग सुचवताना शेट्टींनी 29 ऑगस्ट 2019 रोजीचा शासन निर्णय लागू करण्याची मागणी केली. हा शासन निर्णय स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच काढला होता, ज्यामध्ये तिप्पट नुकसान भरपाई देण्याची तरतूद होती, असे शेट्टी म्हणाले. विरोधी पक्ष नेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी करून राज्यभर आंदोलने केली होती. आज परिस्थिती बिकट असताना आम्ही तीच मागणी करत आहोत, पण मदत करण्याऐवजी सरकार अनावश्यक वाद निर्माण करत आहे आणि गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे हे धोरण घातक आहे, असे शेट्टी म्हणाले.
ऊस दर कपातीवरून अजित पवारांवर निशाणा
राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या टनामागे 15 रुपये कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयावर पुन्हा एकदा टीका केली. हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावामुळे घेण्यात आला असून, 15 रुपयांपैकी 5 रुपये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि उर्वरित 10 रुपये सरकार ठेवून घेणार, हा काय प्रकार आहे? असा सवाल त्यांनी केला. सरकारने घेतलेल्या या ‘जिझिया करा’च्या निर्णयाची आपण होळी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिंदेंना कळलंय शेतकऱ्यांकपेक्षा रस्त्यात जास्त पैसा
सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा आणि शेतकऱ्यांचा काही संबंध आहे का, हे तपासायला हवे. एकनाथ शिंदेंना कळलं आहे की, शेतकऱ्यांपेक्षा जास्त पैसा रस्त्यात आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला. केवळ आश्वासने आणि सभा यापलीकडे काहीही केले जात नाहीये. शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार कोट्यवधी रुपये मंडप आणि कार्यक्रमांवर खर्च करत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर नेपाळ, बांगलादेशसारख्या देशांप्रमाणे आपला देशही पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App