विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Raju Shetti गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आणि नेतेमंडळींकडून कर्जमाफीवरून शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्ये करण्याची एक मालिकाच सुरू आहे. आता या यादीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भर पडली आहे. विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी ‘आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे,’ असे म्हणत मुक्ताफळे उधळली.Raju Shetti
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले वक्तव्य पुढे वाढवताना म्हणाले, सोसायटी काढायची, कर्ज काढायचे, पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचे आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, हे अनेक वर्ष काम चालू आहे, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकरी नेत्यांसह सोशल मीडियातून त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी देखील विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या विधानांचा निषेध केला आहे.Raju Shetti
काय म्हणाले राजू शेट्टी?
राजू शेट्टी म्हणाले, आहो विखे पाटील, 1980 साली शरद जोशींनी उसाला प्रतिटन 300 रुपये दर मिळावा म्हणून तुमच्या कारखान्यावर यशस्वी आंदोलन केले होते. तेव्हा तुमच्या वडीलांनी काढलेल्या इंजिनिअरिंग कॅालेजची फी 4 हजार 500 रुपये होती. त्याच वडिलांचे इंजिनिअरिंग कॅालेज तुम्ही आज चालवताय. त्यामध्ये इंजिनीअंरिगच्या विद्यार्थ्याला 4 लाख 50 हजार रुपये फी घेत आहात. त्याच वडीलांचा साखर कारखाना तुम्ही चालवताय, त्यामध्ये आज उसाला प्रतिटन 3 हजार रुपयांचा दर देताय. इंजिनिअरिंग कॅालेजच्या फी प्रमाणे ऊस दर वाढवला असता तर आज उसाला 30 हजार रुपयांचा दर मिळाला असता. मग आमचेच कर्ज काय तुमच्या कारखान्यावर असलेले कर्ज सुध्दा आम्हीच फेडले असते, असा टोला राजू शेट्टींनी राधाकृष्ण विखे पाटलांना लगावला आहे.
मी स्वतः त्यांची गाडी फोडणार- बच्चू कडू
राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू अत्यंत आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट घोषणा करताना म्हटले आहे की, जो कोणी राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल, त्याला माझ्याकडून एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. इतकेच नव्हे तर, मला जर विखे पाटलांची गाडी दिसली, तर मी स्वतः त्यांची गाडी फोडणार, असा थेट इशाराही त्यांनी दिला. विखे पाटील यांच्यावर टीका करताना कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली, नाव राधाकृष्ण, कृत्य मात्र कंसाचे करायचे असेल, तर कंसाची ही अवलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे. तसेच, फडणवीस साहेब एका बाजूला कर्जमाफीची घोषणा करतात आणि दुसरीकडे हे वाचाळवीर मंत्री असे वक्तव्य करतात. लोक तुम्हाला मारत नाहीत, हे शुक्र आहे, त्यामुळे ही नालायकी थांबवा, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी आपला संताप व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App