विशेष प्रतिनिधी
पुणे : Rupali Chakankar राजगुरूनगरची दोन मुलींच्या हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू लवकरात लवकर चार्जशीट दाखल होइल, राज्य महिला आयोगाकडून आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी आम्ही करू, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.Rupali Chakankar
चाकणकर यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची देखील भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, राजगुरूनगर व लोणावळा येतील घटना ही दुर्दैवी आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालेलआरोपी हा त्या मुलींच्या ओळखीचा फायदा घेत होता. त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन या आरोपींनी या दोन्ही मुलीची हत्या केली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि त्यांच्या सर्व टीमने चांगल्या पद्धतीने तपास करत आरोपीला अटक केली. रात्री 9 वाजून सहा मिनिटांनी गुन्हा दाखल झालेला आहे. रात्री पावणे बारा वाजता या दोन्ही मुलींचा तपास लागला.
चाकणकर म्हणाल्या, त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालवलेली असल्यामुळे त्या मुली त्या ठिकाणच्या भागांमध्ये लग्न असेल किंवा इतर कोणत्या धार्मिक कार्य असेल तर बराच वेळ जेवणासाठी जात. त्याच्यामुळे मधला कालावधीमध्ये केस दाखल झाल्यापासून त्यांचा शोध मंगल कार्यालय किंवा त्या भागामध्ये जिथे जिथे धार्मिक विधी चालू असतील तेथे घेतला.पण रात्री पावणे बारा वाजता त्यांना त्यांच्याच घरामध्ये पाण्याच्या पॅरलमध्ये या दोन्ही मुलींचा मृतदेह आढळून आला.
संबंधित आरोपीचा तपास करायला सुरुवात केल्यानंतर सगळे रेल्वे स्टेशन्स किंवा पश्चिम बंगाल कडे जाणारी वाहतूक व्यवस्था असेल या सगळ्या माध्यमातून तातडीच्या सूचना दिल्या. पाहटे चार वाजता म्हणजे साडेचार तासामध्ये त्यांनी आरोपीला अटक केली.
आपल्या भागामध्ये आलेला नागरिक परराज्यातून आले असतील किंवा बाहेरून आले असतील त्याची माहिती तातडीने आपल्या जवळच्या संबंधित पोलीस विभागाला कळवा. सोसायटीमध्ये नवीन राहिला आलेली व्यक्ती असेल ग्रामपंचायत पंचायत समितीच्या भागांमध्ये असेल प्रभागांमध्ये असेल आपल्या परिसरामध्ये कोणत्याही भागांमध्ये नवीन व्यक्ती बाहेरून राहिला आल्यास तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला असली पाहिजे, असे आवाहन चाकणकर यांनी केले.
कल्याण मधल्या जो आरोपी आहे त्या आरोपीवरीत यापूर्वी देखील गुन्हा दाखल झाला होता पण ऑटिझम सर्टिफिकेट दाखवून त्यावेळेस ती पळवाट काढण्यात आली होती. मी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सूचना करतेय की ऑटिझम सर्टिफिकेट आहे त्यांची परत एकदा पडताळणी करावी. ऑटिझम सर्टिफिकेट वरती कोणालाही त्या पद्धतीने दिलासा दिला जाऊ नये, असे त्या म्हणाल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App